Join us  

लग्नानंतर यशसोबत पळून गेली होती नुसरत जहां, लव्हस्टोरीबाबत केला पहिल्यांदाच खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 4:11 PM

नुसरतने (Nusrat Jahan) पहिल्यांदाच तिच्या नात्याबाबत जाहीरपणे वक्तव्य केलं आणि तिला साथ दिली आहे अभिनेता यशदास गुप्ता (Yash Dasgupta)  याने. त्यांनी सांगितलं की, कशी त्यांची प्रेम कहाणी पुढे गेली. 

बंगाली सिनेमांमधील लोकप्रिय अभिनेत्री नुसरत जहां (Nusrat Jahan) नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. अभिनेत्रीने पुन्हा एकदा एका वक्तव्याने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. नुसरतने पहिल्यांदाच तिच्या नात्याबाबत जाहीरपणे वक्तव्य केलं आणि तिला साथ दिली आहे अभिनेता यशदास गुप्ता (Yash Dasgupta)  याने. त्यांनी सांगितलं की, कशी त्यांची प्रेम कहाणी पुढे गेली. 

बंगाली सिनेमांची लोकप्रिय अभिनेत्री आणि टीएमसीची खासदार नुसरत जहां काही महिन्यांपासून तिच्या पर्सनल लाइफमुळे चांगलीच चर्चेत आहे. यशदास गुप्तासोबतच्या अफेअरवर कधी काही बोलली नसली तरी तिने कधी त्यांचं नातं लपवलं नाही. पहिल्यांदाच तिने यशदास गुप्तासोबतच्या लव्हस्टोरीवर वक्तव्य केलं. 

नुसरत आणि यशचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होत आहे. या व्हिडीओत आपलं प्रेम व्यक्त करताना नुसरत फारच बिनधास्त अंदाजात दिसत आहे. नुसरत यात सांगताना दिसत आहे की, 'मी तुझ्यासोबत पळून गेली होती'.

पळून गेली होती

नुसरत जहांने तिचा रेडिओ शो 'इश्क विद नुसरत' (Ishq with Nusrat) मध्ये यशदास गुप्ताला गेस्ट म्हणून बोलवलं होतं. नुसरतने यशला शोमध्ये 'मेरी चॉईस' म्हणून इन्ट्रोड्यूस केलं. यावेळी बोलताना यशने नुसरतला विचारलं की, आपल्या नात्याची सुरूवात कशी झाली होती? यावर उत्तर देत नुसरत म्हणाली की, 'मी तुझ्यासोबत पळून गेले होते'. हे ऐकून यश आश्चर्याने तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की, 'तू पळून गेली होती?'. तुझा अर्थ आहे की, आपण सोबत हात पकडून रस्त्यावर पळालो होतो?....यावर नुसरत म्हणाली की, 'नाही....नाही...मी तुझ्यासोबत फरार झाली होती. हा योग्य शब्द आहे'.'

नुसरतला सांगायचं होतं की, 'या एपिसोडचा विषय हाच आहे की, 'माझं प्रेम, माझी चॉईस, मी तुझ्यासोबत प्रेमात पडले. ही माझी चॉईस होती आणि बाकी सगळा इतिहास आहे'. नुसरतने लग्नाबाबत सस्पेन्स अजूनही कायम ठेवला आहे. तिने यशदास गुप्तासोबत लग्नाबाबत काहीच सांगितलं नाही. पण या पोस्टमधून तिने हिंट दिली आहे. तिने लिहिलं आहे की, 'हस्बैंड और डैड'. 

टॅग्स :नुसरत जहाँसोशल मीडिया