बॉलिवूडमध्ये अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या मानधनातील तफावत हा मुद्यावर अनेकदा चर्चा झाली आहे. दीपिका पादुकोणपासून अनेक अभिनेत्रींनी मानधनातील असमानतेवर आपली जाहिर नाराजी बोलून दाखवली. हेच कारण होते की, ‘पद्मावत’ या चित्रपटासाठी दीपिकाने रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्यापेक्षा जास्त फी घेतली. मी या रोलसाठी तितकी फी डिजर्व करत होते, असे दीपिकाने म्हटले होते. यानंतर दीपिका पादुकोण इंडस्ट्रीतील सर्वाधिक अभिनेत्री बनली होती. पण आता तिचा हा ‘किताब’ कंगना राणौतने हिसकावून घेतला आहे. होय, आता दीपिका नाही तर कंगना राणौत बॉलिवूडची सर्वाधिक फी घेणारी अभिनेत्री ठरली आहे. ताजी बातमी मानाल तर ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटासाठी कंगनाने १४ कोटी रूपये घेतले. आजपर्यंत कुठल्याही अभिनेत्रीने एका चित्रपटासाठी इतकी फी घेतली नाही.माझी फी माझ्या भूमिकेवर अवलंबून असते. प्रत्येक भूमिका वेगवेगळी असते आणि त्यानुसार त्याची फी ठरते, असे कंगना म्हणते. तेही खरेचं आहे. ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटात कंगना झाशीची राणी लक्ष्मीबाईची व्यक्तिरेखा साकारते आहे आणि या आव्हानात्मक भूमिकेसाठी तसे पाहिले तर १४ कोटी फार जास्त नाहीत.तूर्तास कंगनाचा हा चित्रपट बराच चर्चेत आहेत. ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’साठी कंगनाने प्रचंड मेहनत घेतली आहे. या चित्रपटासाठी ती तलवारबाजी शिकली, घोडेस्वारी शिकली. अखेरच्या टप्प्यात या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुराही तिने सांभाळली आहे. त्यामुळे कंगनाच्या या चित्रपटाचा टीजर अनेकार्थाने खास आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन क्रिश यांनी केले आहे. यामध्ये कंगनासोबतच जिशू सेनगुप्ता, सुरेश ओबेरॉय, डॅनी डॅन्झोप्पा, अतुल कुलकर्णी, अंकिता लोखंडे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. २५ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
दीपिका पादुकोणला विसरा! आता कंगना राणौत बनली सर्वाधिक फी घेणारी अभिनेत्री!!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 09:06 IST