Join us
Daily Top 2Weekly Top 5

...अन् ऑन स्टेज डान्स करताना नोरा फतेहीने स्वत:वरच ओतलं पाणी; व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 15:39 IST

नोराचा एक डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पण, या व्हिडिओमुळे नोराला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नोरा अभिनयाबरोबरच तिच्या नृत्यासाठीही ओळखली जाते. नोरा तिच्या बोल्ड डान्सने चाहत्यांना घायाळ करत असते. तिच्या डान्सचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आतादेखील नोराचा एक डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पण, या व्हिडिओमुळे नोराला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. 

नोराने डान्स प्लस प्रो या रिएलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. या शोसाठी तिने मेटालिक ड्रेस घालत हॉट लूक केला होता. रेमो डिसूजा, पुनीत पाठक आणि राघव जुयाल या शोचं परिक्षक आहेत. डान्स प्लस प्रोमध्ये नोराने नाच मेरी रानी या गाण्यावर डान्स केला. याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत नोरा डान्स करताना दिसत आहे. पण, नंतर डान्स करताना नोराने स्टेजवरच बॉटलमधील पाणी स्वत:च्या अंगावर ओतून घेतलं. तिचा डान्स पाहून रेमोही थक्क झाला होता. पण, नेटकऱ्यांनी मात्र या कृतीसाठी नोराला ट्रोल केलं आहे. 

डिस्ने प्लस हॉटस्टारच्या ऑफिशियल अकाऊंटवरुन नोराचा 'डान्स प्लस प्रो' मधील हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. "हा फॅमिली शो आहे का?" अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने "तरुणांना ती यातून चुकीचा मेसेज देत आहे", असं म्हटलं आहे. एका नेटकऱ्याने "तुझ्याप्रती असलेला आदर गमावला आहेस", अशी कमेंट केली आहे. 

दरम्यान, नोराने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. ती 'मडगांव एक्सप्रेस', 'डान्सिंग डॅड', 'मटका' आणि 'क्रॅक' या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नोरा अनेक रिएलिटी शोमध्ये हजेरी लावत चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.  

टॅग्स :नोरा फतेहीडान्स प्लस 4सेलिब्रिटी