बॉलिवूडची ‘डान्सिंग दीवा’ नोरा फतेही (Nora Faterhi) चर्चेत असते ती तिच्या डान्समुळे. पण सध्या नोरा एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. होय, नोराच्या अफेअरच्या चर्चा सध्या जोरात आहेत. एका लोकप्रिय गायकासोबतच्या गोव्यातील तिच्या फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे आणि हे फोटो पाहून दोघांतही काहीतरी शिजतंय, अशी चर्चा आहे.आता हा गायक कोण? हे जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक असाल तर त्याचं नाव गुरु रंधावा (Guru Randhawa). गुरू व नोराचे गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावरचे फोटो व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहताच दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे. (Nora Faterhi Guru Randhawa Affair)
नोरा व गुरू ‘नाच मेरी रानी’ या म्युझिक व्हिडीओमध्ये एकत्र दिसले होते. दोघांचा हा म्युझिक व्हिडीओ चांगलाच हिट झाला होता. कदाचित नोरा व गुरूने आता दुसºया म्युझिक व्हिडीओची तयारी सुरू केली असावी आणि यासाठी दोघंही गोव्याला गेले असावेत. पण अद्याप याबद्दल कुठलीही ऑफिशिअल घोषणा झालेली नाही. त्यामुळे या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या फोटोंवर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नोराने छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरची सुरूवात केली. ‘बिग बॉस 9’मध्ये एक स्पर्धक म्हणून ती सहभागी झाली. यानंतर मात्र तिनं कधीच मागे वळून पाहिलं नाही.2014 मध्ये तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिला तेलुगू चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. तुम्हाला कदाचित माहित नसेल की, नोरा फक्त नृत्यातच नाही तर मार्शल आर्ट्स मध्येही पारंगत आहे. सत्यमेव जयते, स्ट्रीट डान्सर 3 डी, भारत, भुज-द प्राईड ऑफ इंडिया अशा सिनेमात तिने काम केलं आहे. सौंदर्याची मल्लिका आणि लाखो हृदयाची धडकन बनलेली नोरा आता निर्मात्यांची पहिली पसंती बनली आहे.
गुरू रंधावाबद्दल सांगायचं तर तो तरूणाईचा लाडका गायक आहे. 2012 मध्ये गुरूने त्याच्या सिंगींग करिअरची सुरूवात केली. त्याचं पहिलं गाणं होतं, ‘सेम गर्ल’. अर्थात या गाण्याला फार काही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर दोन वर्षांनी ‘पटोला’ हे गुरूचं नवं गाणं आलं आणि या गाण्यानं गुरूचं आयुष्य बदललं. तो एका रात्रीत स्टार झाला. ‘बन जजा तू मेरी रानी’ हे गाणं गुरूनं कधीकाळी त्याच्या गर्लफ्रेन्डसाठी लिहिलं होतं. पण तेव्हा गुरू स्ट्रगल करत होता आणि यामुळे त्याच्या गर्लफे्रन्डनं त्याला रिजेक्ट केलं होतं.