Join us
Daily Top 2Weekly Top 5

निळू फुलेंच्या जयंतीनिमित्त लेक गार्गीची मोठी घोषणा, पोस्ट शेअर करत म्हणाली, 'बाबा आज...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 16:27 IST

निळू फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांची लेक आणि अभिनेत्री गार्गी फुलेने मोठी घोषणा केली आहे.

निळू भाऊ म्हणजेच निळू फुले (Nilu Phule) यांच्या आवाजात भारदस्तपणा होता. घोगर्‍या, बसक्या आवाजातून फुटणारा शब्द समोरच्या व्यक्तिरेखेचाच नाही, तर पाहणार्‍या तटस्थ प्रेक्षकाच्या मनालाही भितीच्या कवेत घेऊन यायचा. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांची लेक आणि अभिनेत्री गार्गी फुलेने (Gargi Phule) मोठी घोषणा केली आहे.

गार्गी फुलेने सोशल मीडियावर निळू फुले यांचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. याखाली कॅप्शनमध्ये तिने लिहिले, 'appy Birthday बाबा.... आज तूझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने 'निळू फुले सन्मान' या तुझ्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची पुन्हा एकदा घोषणा करते आहे याचा अत्यंत आनंद होतो आहे.7-8 तारखेला जरूर या सगळ्यांनी... वाट पाहते... गार्गी फुले.

यासोबतच गार्गीने कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिकाही शेअर केली आहे. अभिनेते सचिन खेडेकर यांना 'निळू फुले सन्मान' पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. गार्गी फुले स्वत: अभिनेत्री आहे. तिने 'तुला पाहते रे', 'राजा रानीची गं जोडी' अशा गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

टॅग्स :निळू फुलेमराठी अभिनेतागार्गी फुले