Join us
Daily Top 2Weekly Top 5

निलेश साबळेचा जबरा फॅन! कलिंगडावर कोरला अभिनेत्याचा चेहरा, तुम्हीही कराल कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 16:06 IST

अभिनय आणि विनोदाची सांगड घालत प्रेक्षकांना खळखळवून हसवणऱ्या निलेश साबळेचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. अशाच एका जबरा फॅनने त्याला खास सरप्राइज दिलं आहे. 

हसताय ना? हसायलाच पाहिजे...प्रेक्षकांची अशी आपुलकीने विचारपूस करणारा अभिनेता म्हणजे निलेश साबळे. 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करून निलेश साबळे प्रसिद्धीझोतात आला. या शोमुळे तो घराघरात पोहोचला. अभिनय आणि विनोदाची सांगड घालत प्रेक्षकांना खळखळवून हसवणऱ्या निलेश साबळेचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. त्याच्या अशाच एका जबरा फॅनने त्याला खास सरप्राइज दिलं आहे. 

निलेश साबळे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. करिअरबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अनेक अपडेट्सही तो चाहत्यांना देत असतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवरुन एक फोटो शेअर केला आहे. एका चाहत्याने कलिंगडावर निलेश साबळेचा चेहरा कोरला आहे. चाहत्याचं प्रेम आणि कला पाहून निलेश साबळे भारावून गेला आहे. त्याने हा फोटो शेअर करत चाहत्यांचं कौतुक केलं आहे. "एका कलाकाराने कलिंगडावर केलेले माझ्या फोटोचे कार्विंग...खूप छान आणि खूप आभार...त्याच्या कलेला सलाम", असं म्हणत निलेश साबळेने पोस्ट शेअर केली आहे. 

दरम्यान, तब्बल १० वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर झी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. 'चला हवा येऊ द्या' बंद झाल्यानंतर आता निलेश साबळे नवा कॉमेडी शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कलर्स वाहिनीवरील 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' या शोमधून निलेश साबळे दिसणार आहे. यामध्ये भाऊ कदम आणि ओंकार भोजनेदेखील असणार आहे. 

टॅग्स :निलेश साबळेचला हवा येऊ द्याटिव्ही कलाकार