Join us
Daily Top 2Weekly Top 5

निकची Ex गर्लफ्रेन्ड दु:खी, म्हणाली, प्रियंकासोबत नाही करु शकत स्पर्धा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 15:53 IST

प्रियंकासोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहण्याची इच्छा असल्याचंही बोललं जात आहे. अशात निकच्या एक्स गर्लफ्रेन्डने निकच्या नव्या नात्यावर प्रतिक्रिया दिलीये. 

मुंबई : प्रियंका चोप्रा सध्या अमेरिकन गायक निक जोनस याच्यासोबतच्या अफेअरमुळे चांगलीच चर्चेत आहे. सध्या दोघेही भारतात असून दोघांच्या साखरपुड्याचीही चर्चा होत आहे. इतकेच नाहीतर निक हा प्रियंकाबाबत फार सिरिअस असून त्याला प्रियंकासोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहण्याची इच्छा असल्याचंही बोललं जात आहे. अशात निकच्या एक्स गर्लफ्रेन्डने निकच्या नव्या नात्यावर प्रतिक्रिया दिलीये. 

मीडिया रिपोर्टनुसार, निक आणि प्रियंकाची वाढती जवळीक पाहून निकची एक्स गर्लफ्रेन्ड डेल्टा फार दु:खी आहे. निक आणि डेल्टा एकमेकांना 2011 पासून ओळखत होते. दोघेही सिरीअस रिलेशनशिपमध्ये होते. पण 2012 मध्ये दोघांमध्ये दरी निर्माण झाली. आता निकच्या आयुष्यात प्रियंकाच्या येण्याने डेल्टाच्या आशेवर पाणी फेरलं गेलंय. 

प्रियंकाबाबत डेल्टा म्हणाली की, 'मी प्रियंकासोबत स्पर्धा करु शकत नाही. कारण तिच्याकडे प्रिन्स हॅरीची पत्नी मेगन मार्कलसारखी मैत्रीण आहे'.

प्रियंका आणि निक दोघांनीही आपल्या नात्याला केवळ मैत्रीचं नाव दिलं असलं तरी त्यांची केमिस्ट्री वेगळंच काहीतरी सांगते आहे. दोघांमधील वाढलेली जवळीक पाहून हे स्पष्ट दिसतंय की, दोघांमध्ये काहीतरी आहे. इतकेच काय तर निक हा प्रियंकाच्या आईला आणि परिवाराला भेटण्यासाठी भारतात आला. सर्वांनी एकत्र वेळ घालवला. आता दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत.

टॅग्स :प्रियंका चोप्राबॉलिवूड