आज 'ऑस्कर २०२६' आलिशान थाटात आणि भव्यदिव्य अंदाजात पार पडला. या सोहळ्यात भारतीय अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिने प्रेझेंटर म्हणून उपस्थित राहून भारताची शान वाढवली. मात्र, या भव्य सोहळ्यात पोहोचण्यापूर्वी प्रियंका एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावली असून, त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
काय घडला नेमका प्रकार?
ऑस्करच्या मुख्य कार्यक्रमाला पोहोचण्यासाठी प्रियंका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास हे 'गोल्फ कार्ट'चा वापर करत होते. प्रियंका कार्ट गाडीमध्ये समोरच्या बाजूला बसली होती, तर निक मागे दोन सहकाऱ्यांसोबत बसला होता. जेव्हा महिला ड्रायव्हरने कार्ट वळवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा वेग जास्त असल्याने कार्ट एका बाजूला पूर्णपणे झुकली.
सुदैवाने, ड्रायव्हरने वेळेत नियंत्रण मिळवल्याने गाडी पूर्णपणे उलटली नाही आणि मोठा अनर्थ टळला. जर ही कार्ट डाव्या बाजूला पूर्ण झुकली असती, तर प्रियंकाला गंभीर दुखापत झाली असती. याशिवाय प्रियंकानेही कार्टच्या वर हात घट्ट पकडला होता नाहीतर प्रियंका बाहेर फेकली गेली असती. एकूणच प्रियंका यातून वाचल्याने चाहत्यांनी सुटकेचा श्वास घेतला.
प्रियंकाने ऑस्करच्या मंचावर दिमाखात प्रवेश केला. तिने 'इंटरनॅशनल फीचर फिल्म' या श्रेणीतील विजेत्याची घोषणा केली. प्रियंकाचा रेड कार्पेटवरील व्हाईट गाऊनमधील लुक आणि तिचे आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण नेहमीप्रमाणेच सर्वांच्या पसंतीस पडले.
यावर्षी भारताकडून 'होमबाउंड', 'कांतारा चॅप्टर १', 'तन्वी द ग्रेट' आणि 'टूरिस्ट फॅमिली' यांसारख्या चित्रपटांना शॉर्टलिस्ट करण्यात आले होते. मात्र, दुर्दैवाने कोणताही चित्रपट अंतिम नामांकनापर्यंत पोहोचू शकला नाही. २०२३ च्या ऐतिहासिक यशानंतर २०२६ मध्ये मात्र भारताच्या पदरी निराशा पडली आहे. तरीही प्रियंका चोप्राच्या उपस्थितीने जागतिक मंचावर भारताचे प्रतिनिधित्व कायम राहिले.
Web Summary : Priyanka Chopra, attending Oscars 2026, narrowly escaped an accident while traveling via golf cart with her husband, Nick Jonas. A quick save by the driver prevented serious injury. Despite this, she presented an award and looked stunning.
Web Summary : ऑस्कर 2026 में भाग लेने जा रहीं प्रियंका चोपड़ा अपने पति निक जोनस के साथ गोल्फ कार्ट से यात्रा करते समय दुर्घटना का शिकार होने से बाल-बाल बचीं। चालक द्वारा तत्परता से बचाने के कारण गंभीर चोट नहीं आई। इसके बावजूद, उन्होंने पुरस्कार प्रस्तुत किया और वह बहुत सुंदर लग रही थीं।