Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री रुपाली भोसलेच्या घरी आली नवीन पाहुणी, जाणून घ्या कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 16:48 IST

अभिनेत्री रुपाली भोसले हिने काही फोटो शेअर करत तिच्या घरी नवीन पाहुणी दाखल झाल्याचे सांगितले आहे.

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री रुपाली भोसले हिने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. तसेच रुपाली सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो शेअर करत असते. नुकतेच तिने काही फोटो शेअर करत तिच्या घरी नवीन पाहुणी दाखल झाल्याचे सांगितले आहे. आता तुम्ही म्हणाल कोण आहे ही नवीन पाहुणी. तर तिच्या घरी दाखल झालेली नवीन पाहुणी म्हणजे तिची नवीन कार. 

रुपाली भोसलेने २९ डिसेंबरला वाढदिवस साजरा केला. त्यानंतर आता तिने स्वतःलाच कार गिफ्ट केली आहे. तिने स्कोडाची व्हाईट रंगाची कार घेतली आहे. तिने या कारसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिने फोटो शेअर करत म्हटले की, आणि ती इथे आली..माझ्या सुंदरीचे स्वागत आहे. ती फक्त चार चाकी आणि इंजिन नसून माझे घर आहे. माझ्या वाढदिवसाला मी ही डुग्गू स्वतःला गिफ्ट केली आहे. बेबी तुझे स्वागत आहे. 

रुपाली भोसलेच्या या पोस्टवर तिचे चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. रुपाली भोसलेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर रुपाली भोसले सुमीत राघवनसोबतची 'बडी दूर से आये है' ही मालिका प्रचंड गाजली होती. यानंतर रुपाली छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात झळकली.

रुपालीने मराठी मालिकांव्यतिरिक्त हिंदी मालिकेत काम केले आहे.

सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेत काम करते आहे. या मालिकेत ती संजनाच्या भूमिकेत झळकते आहे.

टॅग्स :रुपाली भोसलेबिग बॉस मराठी