Join us

ब्रॅड पिट पुन्हा प्रेमात, या सुंदर 42 वर्षीय महिलेसोबत जुळले सूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2018 15:17 IST

महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रॅड पिटची ही नवी गर्लफ्रेन्ड सिनेमातील अभिनेत्री नाही. ती बुद्धीमत्ता आणि सुंदरतेचा मिलाफ असलेली महिला आहे.

(Image Credit : People.com)

अॅंजेलिना ज्योलीपासून घटस्फोट घेतल्यानंतर हॉलिवूड सुपरस्टार ब्रॅड पिट याला नवी प्रेयसी मिळाली आहे. सध्या या जोडीची जोरदार चर्चा रंगली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रॅड पिटची ही नवी गर्लफ्रेन्ड सिनेमातील अभिनेत्री नाही. ती बुद्धीमत्ता आणि सुंदरतेचा मिलाफ असलेली महिला आहे.

यावेळी ब्रॅड पिटचं मन नेरी ऑक्समॅन या महिलेवर आलं आहे. नेरी ही 42 वर्षीय घटस्फोटीत प्रोफेसर आहे. इतकेच नाहीतर ती एक पुरस्कार विजेती आर्किटेक्ट असून तिने एमआयटीमधून पीएचडीही केली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, सध्या या दोघांमध्ये चांगलीच जवळीक वाढते आहे. दिवसातून अनेकदा दोघे एकमेकांसोबत गप्पाही मारतात. इतकेच नाहीतर ब्रॅड पिटचं मत आहे की, त्याने नेरी इतकी सेक्सी महिला पाहिलीत नाही. या दोघांची भेट सहा महिन्यांपूर्वी झाली होती. आणि लगेच दोघांचं सूत जुळलं. असा ऐकायला मिळतंय की, ब्रॅड पिट हा नेरीवर पूर्णपणे फिदा झालाय.

चर्चा अशीही सुरु आहे की, दोघांनाही आर्किटेक्चर, डिजाइन आणि आर्टची आवड आहे. त्यामुळे दोघांची केमिस्ट्री लगेच जुळली. ब्रॅड हा त्याच्या नव्या प्रेमाबद्दल काही लपवतही नाहीये. पण नेरीला मीडियामुळे चांगलाच त्रास होतो आहे.

अॅंजेलिना ज्योली आणि ब्रॅड पिट हे दोघे सप्टेंबर 2016 मध्ये वेगळे झाले होते. त्यांना सहा मुलं असून त्यांची घटस्फोटाची प्रकिया सुरु आहे.

टॅग्स :ब्रॅड पिटहॉलिवूड