Join us
Daily Top 2Weekly Top 5

"पोलिसांनी मलाही ताब्यात घेतलं होतं, कारण..", नील नितीन मुकेशनं सांगितला न्यूयॉर्कमधील अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 10:47 IST

बॉलिवूड अभिनेता नील नितिन मुकेशने सांगितला खास किस्सा. त्याला न्यूयॉर्क एअरपोर्टवर का ताब्यात घेण्यात होतं? (neil nitin mukesh)

बॉलिवूड अभिनेता नील नितिन मुकेश (neil nitin mukesh) हा गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रीय आहे. नीलला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. 'जेल', 'न्यूयॉर्क', 'जॉनी गद्दार' अशा सुपरहिट सिनेमांमध्ये नील झळकला आहे. नीलने एका मुलाखतीत खास किस्सा सांगितला आहे. जेव्हा नीलला एका सिनेमाच्या शूटिंगदरम्यान आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली होती. काय घडलं नेमकं?

नीलने सांगितला खास किस्सा

मॅशेबल इंडियाला दिलेल्या मुलाखतीत नील नितिन मुकेशने हा किस्सा सांगितला. तो म्हणाला की, "मला न्यूयॉर्क एअरपोर्टवर पोलिसांनी ताब्यात घेतलं. मी भारतीय आहे आणि माझ्याकडे भारतीय पासपोर्ट आहे, यावर पोलिसांना विश्वास बसत नव्हता. माझा जबाब नोंदवायला आणि स्वतःचं म्हणणं मांडायलाही त्यांनी मनाई केली. तब्बल चार तास पोलिसांनी माझी चौकशी केली."

"चार तासानंतर पोलिसांनी माझं मत विचारलं. मी त्यांना इतकंच म्हणालो की, मला गूगल करा तुम्हाला कळेल. पुढे पोलिसांनी माझ्या नावाला गूगल केल्यावर त्यांना त्यांची चूक लक्षात आली. त्यानंतर त्यांनी माझे वडील, आजोबा आणि पूर्ण कुटुंबाबद्दल कुतुहलाने चौकशी केली." अशाप्रकारे नील नितिन मुकेशने खास किस्सा सोशल मीडियावर शेअर केला. नील नितिन मुकेशचा नुकताच रिलीज झालेला 'हिसाब बराबर' हा आर.माधवनची प्रमुख भूमिका असलेला सिनेमा सध्या चर्चेत आहे.

 

टॅग्स :नील नितिन मुकेशबॉलिवूड