Join us

लग्नात परिधान केलेल्या लेहंग्यामुळे जबरदस्त ट्रोल झाली होती नेहा कक्कर,आता दिले यावर स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 12:24 IST

नेहा कक्करनं हे फोटो शेअर करताना "नेहूप्रीत की हल्दी सेरेमनी" असं कॅप्शन दिले होते.या फोटोंवर नेहा कक्करचे फॅन्स तिला शुभेच्छांचा वर्षाव केला होता.

नेहा कक्करने सब्यसाची आणि फाल्गुनी शेन पीकॉक इंडियाच्या वेडींग कलेक्शनमधला लेहंगा लग्नात परिधान केला होता. नेहा या लेहंग्यात खूपच सुंदर दिसत होती. पण याच लेहंग्यामुळे नेहाला  ट्रॉलर्सचा देखील सामना करावा लागला.

कारण अनुष्का शर्मा आणि प्रियंका चोप्राच्या लेहंग्याची कॉपी केल्याचे बोलले गेले. यामुळेच सोशल मीडियावर विनोदी मिम्सदेखील व्हायरल झाले होते. अखेर नेहाने लग्नातला लेहंगा तिने खरेदी केला नसून प्रख्यात डिझायन सब्यासाचीने गिफ्ट केला असल्याचे सांगितले आहे.

लोक सब्यासाचीने डिझाइन केलेले लेहंगा खरेदी करण्यासाठी धडपड करत असतात. मला तर सब्यासाचीकडून गिफ्ट मिळाला त्यामुळे सब्यासाची कलेक्शन लेहंगा लग्नात परिधान करण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले.  

स्वप्न पूर्ण होतात, पण त्यासाठी तुम्हाला मेहनतीची गरज आहे. योग्यरितीने मेहनत कराल तर तुम्हाला यश नक्कीच मिळते.  थैंक्यू माता रानी. शुक्र है वाहेगुरु का असे म्हणत ट्रोलर्सचीही बोलती बंद केली आहे. 

लग्नातच नाही तर लग्नाआधी पार पडलेल्या सगळ्याच कार्यक्रमांमध्ये नेहा सुंदर दिसली. खास स्टाईलमध्ये तिने दागिणे आणि लेहंग्याची निवड केली होती. नेहा कक्करने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन देखील मेहंदी आणि हळदीच्या कार्यक्रमाचे फोटो शेअर केले होते.

या फोटोंमध्ये नेहा खूपच सुंदर दिसत आहे तर तिचा होणारा नवरा देखील क्लासी आणि ट्रेडिशनल लुकमध्ये दिसला.नेहा कक्करनं हे फोटो शेअर करताना "नेहूप्रीत की हल्दी सेरेमनी" असं कॅप्शन दिले होते.या फोटोंवर नेहा कक्करचे फॅन्स तिला शुभेच्छांचा वर्षाव केला होता.

 

नेहा कक्कर आपल्या लग्नाआधी आपल्या पतीसोबत एक गाणं देखील लॉन्च केलं आहे. जे नेहा आणि रोहनप्रीत यांनी गायलं आहे.नेहा कक्कर आणि रोहनप्रीत यांनी आपलं पहिलं गाणं 'देसी म्यूझिक फैक्ट्री' या यूट्यूब चॅनलवर रिलिज केलं आहे.

या गाण्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय.काही दिवसांपूर्वी नेहा आणि रोहनप्रीतनं आपल्या इंस्टाग्राम वरुन दोघांचा फोटो शेअर करत आपल्या नात्याबाबत सांगितलं होतं आणि लग्नाची घोषणा करत सा-यांनाचा आश्चर्याचा धक्का दिला होता. अखेर विवाहबंधनात अडकत नेहाने तिच्या आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. 

 

टॅग्स :नेहा कक्कर