Join us
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेकअपनंतरही नेहाला मिळाले व्हॅलेंटाइन्स डे'चे सरप्राईज, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 10:59 IST

नेहा कक्कर गेल्या काही दिवसांपासून तिच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. मात्र हिमांश कोहलीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ही नेहासाठी हा 'व्हॅलेंटाइन्स डे'खास होता.  

ठळक मुद्देनेहाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहेयात व्हिडीओत नेहाचा एक फॅन तिला प्रपोज करताना दिसतोय.

नेहा कक्कर गेल्या काही दिवसांपासून तिच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. मात्र हिमांश कोहलीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ही नेहासाठी हा 'व्हॅलेंटाइन्स डे'खास होता.  नेहाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात व्हिडीओत नेहाचा एक फॅन तिला प्रपोज करताना दिसतोय. या फॅनचे नाव दीपांशु नारंग आहे. व्हिडीओत दीपांशुने नेहाला फुल आणि कार्ड देताना दिसतोय. 

हा व्हिडीओ शेअर करताना नेहाने लिहिले आहे, 'व्हॅलेंटाइन्स डे'च्या रात्री मला बॅकस्टेज एक सरप्राईज मिळाले. मी खूप नशीबवान आहे की माझ्याकडे तुमच्यासारखे फॅन्स आहेत. दीपांशु नेहाच्या नावाने  neha_holic_deep इन्स्टाग्राम पेजसुद्धा चालवतो.

नेहाला  ब्रेकअपच्या दु:खातून बाहेर पडायला तिला बराच वेळ लागला. पण आता नेहा यातून बाहेर पडलीय. आता तर हिमांश माझ्या योग्यतेचाच नव्हता, असे नेहाने म्हटलेय. ताज्या मुलाखतीत नेहा तिच्या ब्रेकअपबद्दल बोलली. या ब्रेकमागचे खरे कारण तिने सांगितले. मी प्रचंड बिझी होते,आत्ताही आहे. पण या बिझी शेड्यूलमधूनही मी माझा वेळ हिमांशला देत होते. मात्र  तरीही मी वेळ देत नाही अशी त्याची तक्रार असायची. खरे तर मी त्याला माझा अमूल्य द्यावा, इतकीही त्याची योग्यता नव्हती. जो माझ्या योग्यतेचाच नाही, त्याच्यावर मी माझा संपूर्ण वेळ आणि ऊर्जा वाया घालवत होती, असे नेहा म्हणाली.

टॅग्स :नेहा कक्करहिमांश कोहली