Join us
Daily Top 2Weekly Top 5

नेहा कक्कर एक्स बॉयफ्रेंडबदल म्हणाली असे काही, वाचून तुम्हाला वाटेल आश्चर्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 10:55 IST

नेहा कक्कर तिचे ब्रेकअप झाल्यापासून वेगवेगळ्या कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. नेहाला पुन्हा एकदा एक्स बॉयफ्रेंडचा पुळका आला आहे.

ठळक मुद्दे नेहाने इन्स्टाग्रामवर स्टोरी लिहिली आहे नेहाला पुन्हा एकदा एक्स बॉयफ्रेंडचा पुळका आला आहे

नेहा कक्कर तिचे ब्रेकअप झाल्यापासून वेगवेगळ्या कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. नेहाचे अभिनेता हिमांश कोहलीसोबत ब्रेकअप झाले त्यानंतर नेहा सोशल मीडियावर सतत काही तरी प्रेमाबाबत लिहित असते. हिमांशला अनेकदा सोशल मीडियावर टार्गेट करण्यात येते. नेहाला पुन्हा एकदा एक्स बॉयफ्रेंडचा पुळका आला आहे. नेहाने इन्स्टाग्रामवर स्टोरी लिहिली आहे. 

नेहा लिहिते, मी नुकतेच फेक आणि डिस्टर्ब करणारे काही आर्टिकल वाचले. मला सांगायचे आहे की हो, मी दु:खी आहे पण मला कोणी धोका दिला नाही. जर गोष्ट वफादारीची आहे तर तो जगातला सगळ्यात चांगला माणूस आहे. त्यामुळे मी विनंती करते त्याच्यावर खोटे आरोप लावणे बंद करा.'' नेहाची हि पहिलच वेळ नाही जेव्हा ती हिमांशच्या बचावासाठी पुढे आली आहे. नेहाने याआधीही असे केले आहे. त्यावेळी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून तिने मीडियावरचा संताप बोलून दाखवला होता.

काही दिवसांपूर्वीच एक रिअॅलिटी शोच्या मंचावर  गेस्ट म्हणून आली होती. तेव्हा एक परफॉर्मन्स पाहून इतकी भावूक झाली की तिला अश्रू रोखता आले नाही शोच्या एका स्पर्धकाने ‘माही वे’ या गाण्यावर डान्स केला. हे गाणे नेहाने गायलेले आहे. डान्स परफॉर्मन्समध्ये प्रेमाचा त्रिकोण दाखवण्यात आला होता. हा परफॉर्मन्स पाहतांना नेहाला तिचा एक्स बॉयफ्रेन्ड हिमांश कोहलीची आठवण अनावर झाली आणि अचानक तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.  नेहाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला होता.  

टॅग्स :नेहा कक्करहिमांश कोहली