Join us
Daily Top 2Weekly Top 5

हे काय केलंस ताई? नेहा कक्करचा नवा विचित्र लुक पाहून चाहतेही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 14:22 IST

होय, सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असलेल्या नेहाने असे काही फोटो शेअर केलेत की, तिचा अवतार बघून चाहतेही हैराण झालेत.

ठळक मुद्दे नुकतेच नेहा कक्करचे ‘कांटा लगा’ गे गाणं रिलीज झालं आहे. तिचा हा लुक याच गाण्यातील आहे. नेटक-यांनी या गाण्याचीदेखील खिल्ली उडवली आहे.

बॉलिवूडची सिंगर नेहा कक्कर (Neha Kakkar)  सध्या काय तर तिच्या अतरंगी लुकमुळे चर्चेत आली आहे. होय, सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असलेल्या नेहाने असे काही फोटो शेअर केलेत की, तिचा अवतार बघून चाहतेही हैराण झालेत. मग काय, या फोटोवर चाहत्यांच्या रिअ‍ॅक्शन येणारच. काहींंना तिचा हा लुक आवडला. पण अनेकांना तिचा हा अवतार आवडला नाही. अनेकांनी तिची तुलना अमेरिकन रॅपर कार्डी बी हिच्याशी केली. अनेकांनी ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला.

या फोटोंमध्ये नेहाने पिंक ऑफ शोल्डर टॉप आणि पॅरोट ग्रीन रंगाचा कर्ट घातला आहे.  केसांचा गोल्डन विग घातला आहे. नेहाने हे फोटो शेअर केलेत आणि लगेच ते व्हायरल झालेत. तिचे हे फोटो पाहुन चाहत्यांनी मजेदार प्रतिक्रिया दिल्यात.‘हे काय केलंस ताई’, अशा आशयाची कमेंट एका युजरने केली. तू पण रणवीर सिंगला भेटून आलीस वाटतं, अशी मजेदार कमेंट एका युजरने केली. ताई तुला हा लुक काही शोभला नाही. कार्डी बी नाही, छपरी दिसतेय, अशी प्रतिक्रिया अन्य एका युजरने दिली.  

 

 नुकतेच नेहा कक्करचे ‘कांटा लगा’ गे गाणं रिलीज झालं आहे. तिचा हा लुक याच गाण्यातील आहे. नेटक-यांनी या गाण्याचीदेखील खिल्ली उडवली आहे.  त्याआधी तिचे ‘2 फोन’ हे गाणं रिलीज झालं होतं.  तिचं हे गाणं बिग बॉस 14 फेम अली गोनी व जास्मीन भसीन यांच्यावर चित्रीत करण्यात आलं होतं. 

टॅग्स :नेहा कक्कर