Join us
Daily Top 2Weekly Top 5

नेहा कक्करने जागवल्या संघर्ष काळातील आठवणी म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 14:13 IST

नेहा प्राजक्ता कोळीच्या 'प्रीटी फिट'शोमध्ये गेस्ट म्हणून आली होती.

गायिका नेहा कक्कर कोणत्याना कोणत्या गोष्टीला घेऊन सतत चर्चेत असते. नेहा प्राजक्ता कोळीच्या 'प्रीटी फिट'शोमध्ये गेस्ट म्हणून आली होती. प्राजक्ताच्या या नव्या डिजिटल शोमध्ये कलाकार त्यांच्या फिटनेसबाबत बोलताना दिसली होती. प्राजक्ताच्या या नव्या शोची पहिली गेस्ट नेहा होती.    

नेहाने या शोमध्ये आपल्या संघर्ष काळातील आठवणींना उजाळा दिला. नेहाने सांगितले तिने चार वर्षांची असताना तिचा पहिला परफॉर्मेन्स दिला होता. ''इंडियन आयडॉलच्या टॉप 8मध्ये पोहोचल्यानंतर शोमधून बाहेर पडले. त्यावेळी मी पूर्णपणे निराशा झाले होते. मला वाटत होते माझं करिअर संपलं. मी त्यावेळी एलिमिनेशनलले जे गाणं गायले होते ते गाणं नुकतंच इंडियन आयडॉलमध्ये एका स्पर्धकाने गायले हे ऐकायल्यावर मला वाटले मी किती दूर निघून आले आहे.''

नेहा कक्कर आणि शोचा होस्ट आदित्य नारायण यांच्यात खुल्लमखुल्ला सुरु असलेले फ्लर्ट चर्चेचा विषय बनला आहे. उदित नारायण नेहा व आदित्यच्या लग्नाबद्दल बोलले. यावर त्यांचे उत्तर ऐकून सगळेच चाट पडले. ‘नेहा कक्कर खूप प्रेमळ मुलगी आहे. मला ती आवडते. मी खरोखर तिला लाईक करतो. इतक्या लहान वयात तिने खूप मोठे नाव कमावले आहे. नेहा व आदित्यची जोडी चांगली दिसले, याऊपर मला काहीही माहित नाही. पण भविष्यात हे लग्न झालेच तर माझा फायदा निश्चित आहे. होय, या लग्नानंतर आमच्या घरात एक फिमेल सिंगर सामील होईल.आमच्या घरातील फिमेल सिंगरची कमतरता भरून निघत असेल तर तो माझा मोठा फायदा असेल,’असे उदित नारायण म्हणाले. एकंदर काय तर उदित नारायण ‘राजी’ आहेत. आता नेहा-आदित्य राजी होतात का ते बघूच.

टॅग्स :नेहा कक्कर