Join us  

प्रेमासाठी वाट्टेल ते! नीना गुप्ता यांच्या कॉलेजबाहेर शक्ती कपूर मारायचे फेऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 6:15 PM

Neena gupta: नीना गुप्ता यांचं महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीतील जानकी देवी कॉलेजमध्ये झालं. या कॉलेजमधील असंख्य आठवणी त्यांनी शेअर केल्या आहेत.

ठळक मुद्देशक्ती कपूर रोज त्यांच्या कॉलेजच्या बाहेर बाईकवरुन फेऱ्या मारायचे.

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (neena gupta) सध्या त्यांच्या आत्मचरित्रामुळे सातत्याने चर्चेत येत आहे. 'सच कहूँ तो' या आत्मचरित्रामध्ये त्यांनी त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. आयुष्याची प्रत्येक पायरी चढत असताना त्यांनी किती संकट, अवहेलना सहन केली याचं सविस्तर वर्णन त्यांनी या आत्मचरित्रात केलं आहे. सोबतच त्यांनी जीवनातील काही रंजक किस्स्यांवरही प्रकाश टाकला आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शक्ती कपूर (shakti kapoor) एकेकाळी नीना गुप्ता यांच्या कॉलेजबाहेर घिरट्या घालायचे, असा खुलासाही त्यांनी या पुस्तकात केला आहे.

नीना गुप्ता यांचं महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीतील जानकी देवी कॉलेजमध्ये झालं. या कॉलेजमधील असंख्य आठवणी त्यांनी शेअर केल्या आहेत. यामध्येच त्यांनी शक्ती कपूर यांचीही आठवण सांगितली आहे. शक्ती कपूर रोज त्यांच्या कॉलेजच्या बाहेर बाईकवरुन फेऱ्या मारायचे. विशेष म्हणजे कॉलेजमधल्या प्रत्येक मुलीचं त्यांच्यावर क्रश होतं.

"बऱ्याच वर्षानंतर शक्ती कपूरसोबत कॉलेजच्या दिवसातील आठवणींविषयी चर्चा करण्याचा योग आला. त्यावेळी त्यांची एक प्रेयसी जानकी देवी कॉलेजमध्ये शिकत होती असं त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे त्यावेळी शक्ती कपूर बाईकवर रोज त्यांच्या प्रेयसीला कॉलेजमध्ये सोडायला व घेऊन जायला येत असतं. परंतु, बाईकवरुन येणाऱ्या त्या दोघांमधील एक व्यक्ती शक्ती कपूर होते हे मला कधी समजलंच नाही. मात्र, त्यांच्यावर कॉलेजच्या सगळ्या मुलीचं क्रश होतं.उभं आयुष्य आम्ही एकमेकांच्या आसपास वावरत होतो. परंतु, कॉलेजमध्ये बाईकवर येणारा तो मुलगा शक्ती कपूर होता हे कधी समजलंच नाही", असं नीना गुप्ता यांनी पुस्तकात नमूद केलं आहे.

पुढे त्या म्हणतात,  "जवळपास सगळं आयुष्य आम्ही एकमेकांच्या आसपास वावरत होतो. परंतु, आमचे रस्ते कधी जुळलेच नाही. मला अजूनही या गोष्टीवर विश्वास बसत नाही की कॉलेजमध्ये बाईकवर येणारा तो मुलगा शक्ती कपूर होता.  त्याची एक झलक पाहण्यासाठी सगळ्या मुलींची धडपड असायची आणि त्याच्या गर्लफ्रेंडवर सगळ्या मुली जळायच्या.''

दरम्यान, नीना गुप्ता लवकरच एका बॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत अमिताभ बच्चन, परिणीती चोप्रा, अनुपम खेर , बोमन इराणी आणि सारिका स्क्रीन शेअर करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

टॅग्स :नीना गुप्ताशक्ती कपूरबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा