Join us

संपता संपेना या बॉलिवूड कपलचा रोमान्स, शेअर केलेत बोल्ड फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 15:11 IST

कुणाच्याही ध्यानीमनी नसताना दोघांनी गुपचूप लग्न केले. गत 4 जुलैला आर्य पद्धतीने दोघांनी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर दोघांनीही आपले अनेक फोटो शेअर करण्याचा सपाटा लावला आहे.

ठळक मुद्देपूजा बत्रा दीर्घकाळापासून अभिनेता नवाब शाहला डेट करत होती. पूजाचे हे दुसरे लग्न आहे.

बॉलिवूड अभिनेता नवाब शाह आणि अभिनेत्री पूजा बत्रा नुकतेच लग्न बंधनात अडकले. कुणाच्याही ध्यानीमनी नसताना दोघांनी गुपचूप लग्न केले. गत 4 जुलैला आर्य पद्धतीने दोघांनीही लग्नगाठ बांधली. लग्नानंतर दोघांनीही आपले अनेक फोटो शेअर करण्याचा सपाटा लावला आहे. ताज्या फोटोत नवाब व पूजा दोघेही स्वीमिंग पूलमध्ये दिसत आहेत.

‘संडे के फंडे’ असा हा फोटो शेअर करताना नवाबने लिहिले आहे. या फोटोत पूजा लाल बिकिनीत दिसतेय. हा बोल्ड फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

यापूर्वी पूजा व नवाबने एक बोल्ड फोटोशूट केले होते. त्या फोटोशूटचीही प्र्रचंड चर्चा झाली होती.

पूजा बत्रा दीर्घकाळापासून अभिनेता नवाब शाहला डेट करत होती. पूजाचे हे दुसरे लग्न आहे. याआधी तिने एनआरआय डॉक्टर सोनू अहलूवालियासोबत लग्न केले होते आणि लग्नानंतर इंडस्ट्री सोडली होती. पण लग्नाच्या नऊ वर्षांनंतर त्या दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर तिने अभिनयक्षेत्रात कमबॅक केला होता. पण तिला  यश मिळाले नाही.

पूजाचे अभिनेता अक्षय कुमारसोबतचे अफेअर देखील चांगलेच गाजले होते. पूजाच्या मॉडलिंगच्या दिवसांपासून ती अक्षयला ओळखत होती. आजही पूजा आणि अक्षय यांच्यातील मैत्री कायम आहे. पूजाच्या २०१७ ला प्रदर्शित झालेल्या ‘मिरर गेम’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला अक्षयने आवर्जून उपस्थिती लावली होती. 

टॅग्स :पूजा बत्रा