Join us
Daily Top 2Weekly Top 5

"कुणाचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्यायचा हे सांगायला तू काय राष्ट्रपती आहेस का?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 16:56 IST

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये नेपोटिजम, बॉलिवूड माफिया आणि इनसाइडर-आऊटसाइडर यावर युद्ध सुरु झाले आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये नेपोटिजम, बॉलिवूड माफिया आणि इनसाइडर-आऊटसाइडर यावर युद्ध सुरु झाले आहे. यामुळे बॉलिवूडमध्ये दोन गट पडले आहे. कंगना राणैतने काही दिवसांपूर्वी  करण जोहरचा  पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा अशी सोशल मीडियावरुन सरकाराला विनंती केली होती. यावर आता कंगनाचे नाव न घेतला नसिरुद्दीन शाहांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखती दरम्यान नसिरुद्दीन शाह यांनी कंगनाचे नाव न घेतला तिला प्रश्न विचाराला आहे की,  बाई, तू काय राष्ट्रपती आहेस का?', 

 पुढे ते म्हणाले, सुशांतसोबत जर खरंच अन्याय झाला असेल तर त्याला न्याय मिळायला हवा. त्याची सुद्धा एक प्रोसेस आहे.  आपण प्रत्येकवेळी यामध्ये पडायलाच हवं असं नाही.कुणाचा पद्मश्री काढून घ्यायचा आणि कुणाची नाही हे सांगण्याचा अधिकार तिला नाही. आपल्या पैकी एकामध्ये तिला तिची जागा दाखवण्याची हिंमत आहे. 

  गेल्या काही दिवसांपासून नसिरुद्दीन शाह आणि कंगना राणौतमध्ये सोशल मीडियावर कॉल्ड वॉर सुरु आहे. याआधीही नसिरुद्दीन शाह यांनी केलेल्या टीकेला कंगनाने 'इतक्या महान कलाकाराच्या शिव्याही प्रसादासारख्या आहेत. नसीरजी एक महान कलाकार आहेत. इतके महान कलाकार की, त्यांच्या शिव्याही देवाच्या प्रसादासारख्या आहेत. यापेक्षा मी त्यांच्यासोबत सिनेमा आणि गेल्यावर्षी आमच्या क्राफ्टवर झालेलं शानदार कन्व्हर्सेशन बघणं पसंत करेन. जेव्हा तुम्ही म्हणाले होते की, तुम्हाला माझं काम किती आवडतं'. ट्विटरवर अशा शब्दात उत्तर दिले होते. आता कंगना नसिरुद्दीन शाह यांच्या टीकेला काय उत्तर देणार हे लवकरच कळेल. 

टॅग्स :नसिरुद्दीन शाहकंगना राणौत