Join us
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय कुमारसोबत झळकलेल्या या अभिनेत्रीला ओळखणे देखील झाले अशक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 18:18 IST

उर्वशीचा एक फोटो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या फोटोत ती खूपच वेगळी दिसत आहे. तिचे वजन कित्येक किलोने वाढलेले दिसून येत आहे.

अक्षय कुमारचा खट्टा मिठा हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. या चित्रपटात अक्षयच्या बहिणीच्या भूमिकेत आपल्याला उर्वशी शर्मा या अभिनेत्रीला पाहायला मिळाले होते. उर्वशीने खट्टा मिठाप्रमाणेच अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2007 साली नकाब या चित्रपटापासून बॉलिवूडमधील तिच्या करियरला तिने सुरुवात केली. त्यानंतर ती बाबर, आक्रोश, चक्रधर यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये झळकली. उर्वशी ही गेल्या कित्येक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. तिने काही महिन्यांपूर्वी छोट्या पडद्यावरील एका मालिकेत काम केले होते. अम्मा या मालिकेत अम्मा या मुख्य भूमिकेत ती प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. या मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. ही मालिका संपून एक-दीड वर्षंच झालेले आहेत. पण या कालावधीत आता उर्वशीमध्ये चांगलाच बदल झाला आहे. तिला ओळखणे देखील कठीण झालेले आहे.

उर्वशीने सचिन जोशीसोबत लग्न केले असून सचिन हा अभिनेता आणि बिझिनेसमन आहे. त्यांच्या दोघांचे लग्न 2012 मध्ये झाले असून लग्नानंतर सचिनने तिचे नाव रैना असे ठेवले आहे. सचिन एका मोठ्या कंपनीचा चेअरपर्सन असून त्याची एक प्रोडक्शन कंपनी देखील आहे. त्याचा व्यवसाय हा गोव्यात असून गोव्यातील विजय माल्या यांच्या किंगफिशर विला सचिननेच लिलावामध्ये 73 कोटींमध्ये खरेदी केला होता. 

उर्वशीचा एक फोटो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या फोटोत ती खूपच वेगळी दिसत आहे. तिचे वजन कित्येक किलोने वाढलेले दिसून येत आहे. या फोटोवरून सोशल मीडियावर तिला चांगलेच ट्रोल केले जात आहे. ती फुटबॉलसारखी दिसतेय असे काहींचे म्हणणे आहे तर काहींनी तू सचिनची आई वाटत आहेस असे म्हटले आहे. 

उर्वशीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले असले तरी त्यावर तिने मौन राखणेच पसंत केले आहे. उर्वशी यावर काही उत्तर देते का हे लवकरच कळेल. उर्वशी काही दिवसांपूर्वी मुंबईत एका कार्यक्रमात देखील दिसली होती. 

टॅग्स :उर्वशी शर्माअक्षय कुमार