Join us

नाना पाटेकरांनी केलं माधुरी दीक्षितचं कौतुक, म्हणाले- "ती एक उत्तम अभिनेत्री असून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 14:05 IST

'वनवास' सिनेमाच्या निमित्ताने नाना पाटेकर, दिग्दर्शक अनिल शर्मा, अभिनेता उत्कर्ष शर्मा आणि अभिनेत्री सिमरत कौर कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी झाले होते. याशोमध्ये त्यांनी वजूद सिनेमाचा अनुभव सांगत माधुरी दीक्षितचं कौतुक केलं.

नाना पाटेकर हे कलाविश्वातील दिग्गज अभिनेते आहेत. गेली कित्येक दशकं अभिनय आणि विविधांगी भूमिका साकारून नाना प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. एक सो एक सुपरहिट सिनेमे दिलेले नाना 'वनवास' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने ते अनेक ठिकाणी मुलाखती देत आहेत. अशाच एका मुलाखतीत नानांनी 'वजूद' सिनेमात माधुरी दीक्षितसोबत काम केल्याचा अनुभव शेअर केला.

'वनवास' सिनेमाच्या निमित्ताने नाना पाटेकर, दिग्दर्शक अनिल शर्मा, अभिनेता उत्कर्ष शर्मा आणि अभिनेत्री सिमरत कौर कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी झाले होते. याशोमध्ये त्यांनी वजूद सिनेमाचा अनुभव सांगत माधुरी दीक्षितचं कौतुक केलं. नाना म्हणाले, "हा अनुभव खूपच छान होता. माधुरी एक उत्तम अभिनेत्री आणि उत्कृष्ट डान्सर आहे. एक अभिनेत्री म्हणून जे गुण असावेत ते सगळे तिच्याकडे आहेत. याशिवाय ती एक उत्तम व्यक्ती आहेत. त्यामुळेच मी तिचं कौतुक करतो". 

नाना पाटेकर यांचा 'वजूद' सिनेमा १९९८ साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमात नाना पाटेकर, माधुरी दीक्षित, मुकुल देव, जॉनी लिव्हर, राम्या क्रिश्नन या कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या. नाना पाटेकरांचा हा सिनेमा प्रचंड गाजला होता. दरम्यान, आता ते वनवास मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हा सिनेमा २० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :नाना पाटेकरमाधुरी दिक्षितसेलिब्रिटी