Join us
Daily Top 2Weekly Top 5

नाना पाटेकर यांनी ७५० रुपयात उरकलं होतं लग्न आणि हनीमून, कोण आहे त्यांची पत्नी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 13:28 IST

Nana Patekar : नाना पाटेकर यांचे फिल्मी करिअरप्रमाणे त्यांचे खासगी आयुष्यही चर्चेत असते. नाना पाटेकर यांच्याप्रमाणे त्यांची पत्नीही प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.

आपला दमदार अभिनयाने रसिकांची मने जिंकणाऱ्या नाना पाटेकर (Nana Patekar) यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीत त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. नाना पाटेकर यांचे फिल्मी करिअरप्रमाणे त्यांचे खासगी आयुष्यही चर्चेत असते. नाना पाटेकर यांच्याप्रमाणे त्यांची पत्नीही प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. अभिनेत्री निलकांती पाटेकर यांनी आपल्या सहज सुंदर अभिनयाने रसिकांची पसंती मिळवली आहे.नाना पाटेकर आणि निलकांती यांचं लग्न आणि हनीमून फक्त ७५० रुपयात उरकले होते.

नाना पाटेकर थिएटरच्या काळात निलकांती यांच्या प्रेमात पडले. दोघेही लग्नासाठी तयार होते. निलकांती बँकेत अधिकारी होत्या, त्यांचा पगार होता २५०० रुपये महिना होता. आणि नाना पाटेकर एका शोमधून पन्नास रुपये कमावायचे. त्यावेळी दोघांची कमाई सुखाने जगण्यासाठी पुरेशी होती. दोघेही दर महिन्याला बचत करायचे. बचत केलेल्या ७५० रुपयात त्यांनी लग्न आणि हनीमून केले होते. निलकांती यांनी जास्त कलाविश्वात काम केले नाही.पण नाना पाटेकरांना नेहमीच पाठिंबा दिला. परंतु सध्या समोर आलेल्या माहितीनूसार ते दोघं एकमेकांपासून वेगळेही राहतात. 

नाना पाटेकर आणि निलकांती यांना मल्हार नावाचा मुलगा आहे. नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार हुबेहुब नानांसारखा दिसतो. नानांसारखा साधेपणा त्याला खूप आवडतो. त्याचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आहे, जे त्याने वडील नाना पाटेकर यांच्या नावाने सुरू केले आहे. त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव नाना साहेब प्रॉडक्शन हाऊस आहे.

टॅग्स :नाना पाटेकर