80 व 90 च्या दशकात मनीषा कोईराला एक मोठी अभिनेत्री होती. साहजिकच ती शिंकली तरी बातमी व्हावी, अशी परिस्थिती होती. अशात मनीषाच्या लव्ह अफेअरच्या बातम्या चांगल्याच गाजल्या होत्या. होय, मराळमोळे अभिनेते नाना पाटेकर व मनीषा कोईराला यांची लव्हस्टोरी एकेकाळी प्रचंड चर्चेत होती.
‘अग्निसाक्षी’ या चित्रपटात नाना पाटेकर व मनिषा कोईराला सोबत काम केले होते. असे म्हणतात की, याच चित्रपटाच्या दरम्यान नाना आणि मनिषा एकमेकांच्या प्रेमात पडले. एवढेच नव्हे तर ते दोघे लग्न देखील करणार होते. खरे तर नाना पाटेकर आधीच विवाहित होते. पण मनीषा ते विवाहित आहे हे माहित असूनही मनीषा त्यांच्या प्रेमात आकंठ बुडाली होती.
कालांतराने नानाही मनीषाबद्दल नको इतके पझेसिव्ह होऊ लागले होते. त्यांचा स्वभाव मनीषासाठी त्रासदायक ठरत होता. पण तरीही मनीषा नानाला सोडायला तयार नव्हती. मग हे नाते तुटले कसे तर एका अभिनेत्रीमुळे.होय, मनीषा नानांच्या प्रेमात वेडी झाली असतानाच नानांच्या आयुष्यात आयशा जुल्काची एन्ट्री झाली आणि यानंतर सगळे काही बिघडले.
अशात एकदा मनिषा नानाला भेटायला गेली होती. त्यावेळी नानाच्या रूममध्ये आयशा होती. आयशाला पाहून मनिषाची तळपायाची आग मस्तकात गेली. मनिषा आयशावर ओरडा ओरडा करायला लागली. हे सगळे पाहून आयशा देखील चिडली. या घटनेनंतर मात्र मनीषाला कळायचे ते कळले आणि तिने नानांसोबतचे सगळे संबंध तोडून टाकले. 2010 मध्ये मनीषाने नेपाळी बिझनेसमॅन सम्राट दहलसोबत लग्न केले. अर्थात 2012 साली तिचा घटस्फोट झाला.