Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोण आहे शोभिता धुलिपाला? समंथाशी घटस्फोटानंतर नागा चैतन्यने तिच्याशी केला साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 14:47 IST

अभिनेता नागा चैतन्यने हैदराबाद येथे इंटिमेट सेरेमनीमध्ये शोभिता धुलिपालाशी साखरपुडा केला.

साऊथ सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यने (Naga Chaitanya) अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी (Sobhita Dhulipala) आज साखरपुडा केला. नागा चैतन्यचा समंथा रुथ प्रभूशी तीन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. त्यानंतर त्याच्या आयुष्यात शोभिता आली. नागा आणि समंथाचा घटस्फोट खूप चर्चेत राहिला. नुकतंच अभिनेते नागार्जुन यांनी लेकाच्या साखरपुड्याचा फोटो पोस्ट केला आहे. शोभिता धुलिपाला नक्की आहे तरी कोण जाणून घ्या.

अभिनेता नागा चैतन्यने हैदराबाद येथे इंटिमेट सेरेमनीमध्ये शोभिता धुलिपालाशी साखरपुडा केला. 2017 साली त्याने अभिनेत्री समंथा रुथ प्रभूशी थाटात लग्न केले होते. दोघं एकमेकांच्या आकंठ प्रेमात होते. मात्र लग्नानंतर चार वर्षांनी 2021 साली त्यांनी घटस्फोट जाहीर केला. यामागचं कारण अद्याप कळलेलं नाही. घटस्फोटानंतर तीन वर्षांनी नागा चैतन्य पुन्हा प्रेमात पडला आहे. गेल्या काही वर्षांपासूनच तो अभिनेत्री शोभिता धुलिपालाला डेट करत होता. दोघंही परदेशात व्हॅकेशनसाठी गेल्याच्याही चर्चा झाल्या होत्या. दरम्यान आज साखरपुडा करत दोघांनी आपलं नातं जाहीर केलं.

कोण आहे शोभिता धुलिपाला?

शोभिताचा जन्म 31 मे 1992 रोजी आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू कुटुंबात झाला. शोभिता ३२ वर्षांची असून नागा चैतन्य ३७ वर्षांचा आहे. शोभिताने इकोनॉमिक्समध्ये मास्टर्स केले आहे. यानंतर तिने मॉडेलिंगला सुरुवात केली. 2013 साली तिने 'मिस इंडिया अर्थ' हा खिताब जिंकला. त्याच वर्षी ती मिस इंडिया पेजेंटमध्ये दुसर्‍या क्रमांकावर होती. यानंतर शोभिताने सिनेमांसाठी ऑडिशन दिल्या.

 2016 साली तिने अनुराग कश्यपच्या 'रमन राघव 2.0' सिनेमातून पदार्पण केलं. सैफ अली खानसोबत ती 'शेफ' सिनेमातही दिसली. 'मेड इन हेवन' या सीरिजमधून शोभिताला खरी ओळख मिळाली. नंतर अनिल कपूर आणि सिद्धार्थ रॉय कपूरच्या 'द नाईट मॅनेजर' मधून ती रातोरात स्टार झाली. रणवीर सिंहसोबतच्या एका जाहिरातीमधूनही ती चर्चेत आली होती. 

टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटीलग्ननागार्जुन