Join us

"आमच्या कुटुंबात तुझं...", नव्या सुनेसाठी नागार्जुनची खास पोस्ट; नागा चैतन्य-शोभिताला दिले आशीर्वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 10:15 IST

साऊथ सुपरस्टार नागार्जुनचा (Nagarjuna) मुलगा अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) नुकताच लग्नबंधनात अडकला आहे.

Naga Chaitanya And Shobita Dhulipala Wedding: साऊथ सुपरस्टार नागार्जुनचा (Nagarjuna) मुलगा अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. शोभिता धुलीपालासोबत (Shobita Dhulipala) त्याने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. काल ४ डिसेंबरच्या दिवशी हैदराबाद येथील अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये या दोघांचा विवाहसोहळा थाटात संपन्न झाला. आता नागा चैतन्य-शोभिताने त्यांच्या नव्या आयुष्याला सुरूवात केली आहे. त्यांच्या या लग्नसोहळ्यात तेलूगु सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार मंडळींनीही हजेरी लावली. दरम्यान, सोशल मीडियावरही त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा होताना दिसतेय. नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नामुळे अक्कीनेनी कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. नव्या सूनेच्या स्वागतासाठी संपूर्ण कुटुंब सज्ज झालं आहे. अशातच अभिनेता नागार्जुनने नव्या सुनबाईंसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत तिचं स्वागत केलं आहे. 

आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर शोभितासाठी पोस्ट शेअर करत अभिनेत्याने लिहलंय, "शोभिता आणि माझा मुलगा नागा चैतन्य यांनी आपल्या नव्या आयुष्याला सुरूवात केली आहे. त्यांचा हा नवीन प्रवास सुरू होताना पाहणं हा क्षण माझ्यासाठी भावनिक होता. चैतन्य तुझं खूप खूप अभिनंदन! प्रिय शोभिता तुझं अक्कीनेनी कुटुंबात मनापासून स्वागत... तू आमच्या आयुष्यात आनंद घेऊन आलीस." अशी पोस्ट लिहून नागार्जुन यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच नव्या सुनबाई म्हणजेच शोभिताचं अक्कीनेनी कुटुंबात त्यांनी स्वागत केलं आहे.

दरम्यान, नागा चैतन्यने २०१७ साली अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सोबत लग्न केलं होत. त्याआधीपासून ते एकमेकांना डेट करत होते. परंतु काही मतभेदांमुळे २०२१ मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अवघ्या ४ वर्षांतच त्यांचा संसार मोडला. 

टॅग्स :सेलिब्रेटी वेडिंगसोशल मीडिया