Join us

समंथापासून विभक्त झाल्यावर नागा चैतन्य दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर? या अभिनेत्रीला करतोय डेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 17:07 IST

नागा चैतन्यसोबत घटस्फोट झाल्यानंतर समंथा अजूनही सिंगल आहे तर अभिनेत्याचं नाव दुसऱ्या एका अभिनेत्रीसोबत जोडलं जातेय.

साऊथ सिनेमाचा स्टार नागा चैतन्य आपल्या चित्रपटांपेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे सध्या चर्चेत आहे. नागा 2021 मध्ये त्याची अभिनेत्री समंथा रुथ प्रभूपासून विभक्त झाला. यानंतर नागाचं नाव सातत्याने दुसऱ्या एका अभिनेत्रीसोबत जोडलं जातंय. लंडनमध्ये पुन्हा एकदा नागा त्याच अभिनेत्रसोबत स्पॉट झाला. ज्याचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले. 

नागा आणि अभिनेत्री शोभिता धुलिपालाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रेस्टोरंटमधील शेफ असणाऱ्या सुरेंद्र मोहन यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ते अभिनेता नागा चैतन्यसोबत पोझ देताना दिसून येत आहेत. या फोटोमध्ये हे दोघेच असल्याचं पहिल्या नजरेत वाटतं. मात्र फोटोला निरखून पाहिलं तर लक्षात येत की, या दोघांच्या मागे टेबलवर अभिनेत्री शोभिता धूलिपला बसलेली दिसून येत आहे. जिने चेहऱ्यावर हात ठेवलेला आहे. हा फोटो समोर येताच त्यांच्या नात्याबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या आहेत.

नागा चैतन्यने 2017 मध्ये समंथा रुथ प्रभूसोबत लग्न केले. दोघांनी लग्नाआधी काही वर्षे एकमेकांना डेट केले होते, पण लग्नाच्या चार वर्षातच नागा आणि समंथा यांच्यात मतभेद सुरू झाले आणि त्यानंतर ऑक्टोबर 2021 मध्ये दोघेही वेगळे झाले. घटस्फोटानंतर, समंथा कामात पूर्णपणे व्यस्त झाली आणि ती अजूनही सिंगल आहे. तर नागाचं नाव शोभिता धूलिपलासोबत जोडलं गेलं आहे.  

कोण आहे शोभिता?शोभिता ही एक लोकप्रिय मॉडेल व अभिनेत्री आहे. मेड इन हेवन या सुपरहिट वेब शोमध्ये ती दिसली होती. अलीकडे महेशबाबूच्या मेजर या चित्रपटात ती दिसली होती. शोभिता हिंदी, मल्याळम, तेलगू चित्रपटात काम करते. सोशल मीडियावर ती सतत स्वत:चे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. 

टॅग्स :Tollywoodसमांथा अक्कीनेनीसेलिब्रिटी