Join us
Daily Top 2Weekly Top 5

'नाळ' सिनेमातल्या चैत्याच्या आईची भूमिका साकारणारी देविका दफ्तरदारची बहिणही आहे प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 18:47 IST

आपल्या विविधांगी भूमिकेतून देविका दफ्तदारने रसिकांची मनं जिंकली आहेत. नागराज मंजुळे दिग्दर्शित नाळ सिनेमात देविकाने चैत्याच्या आईची भूमिकाही भाव खावून गेली. गर्ल्स सिनेमातल्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले होते.

इंडस्ट्रीत अनेक कलाकरांची भाऊ- बहिणींच्या जोड्या क्षेत्रात कार्यरत असणारे अनेक उदाहरणं आहेत. हिंदी असो किंवा मराठी दोन्ही क्षेत्रात बहिणी-बहिणी किंवा भाऊ- बहिण आपल्या अदाकारीने रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरले आहेत. या कलाकारांच्या भाऊ-बहिणींबद्दल जाणून घेण्यातही रसिकांची प्रचंड ईच्छा असते. आपल्या विविधांगी भूमिकेतून देविका दफ्तदारने रसिकांची मनं जिंकली आहेत. नागराज मंजुळे दिग्दर्शित नाळ सिनेमात देविकाने साकारलेली चैत्याच्या आईची भूमिकाही  भाव खावून गेली. 'गर्ल्स' सिनेमातल्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले होते.

 तुम्हाला माहिती आहे का? अनेक आशयपूर्ण चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारणारी देविकाची बहिणही अभिनेत्री आहे. रेणुका दफ्तरदार असे देविकाच्या बहिणीचे नाव आहे. रेणुका ही देविकाची मोठी बहिण आहे. अभिनेत्री रेणुका दफ्तरदारने 'घो मला असला हवा', 'दहावी फ', 'बाधा,' 'विहीर', 'कैरी' अशा विविध धाटणीच्या सिनेमातून रसिकांची पसंती मिळवली आहे. इतकंच काय तर भाडीपाचा  ''शास्त्र असतं ते ''डायलॉगने  रेणुका दफ्तरदारच्या खास शैलीमुळे चांगलाच सुपरहिट ठरला आहे.  

दोन्ही बहिणींनी आपल्या मेहनतीने इंडस्ट्रीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. दोघींचीही तितकीच लोकप्रियता आहे.आपल्या दर्जेदार अभिनयामुळेच रेणुका आणि देविका दोघींचाही प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.  

टॅग्स :नाळ