Join us
Daily Top 2Weekly Top 5

देशाला खड्ड्यातून काढण्याची गरज, 2019मध्ये नरेंद्र मोदींनी पुन्हा पंतप्रधान व्हावं- कंगना राणौत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2018 09:35 IST

आपल्या विधानांमुळे कायम चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतनं आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात एक मोठं विधान केले आहे. 

मुंबई - आपल्या विधानांमुळे कायम चर्चेत राहणारी बॉलिवूडमधील अभिनेत्री कंगना राणौतनं आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात एक मोठं विधान केले आहे. ''पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदासाठी सर्वाधिक चांगले आणि योग्य उमेदवार आहेत. 2019 लोकसभा निवडणुकीतही नरेंद्र मोदी यांचाच विजय व्हावा. आपणा सर्वांनाच माहिती आहे की आपला देश खड्ड्यात आहे. देशाला खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी 5 वर्षांचा कालावधी खूपच अल्प असा आहे. त्यामुळे देशहितासाठी मोदींना संधी द्यावी '',असे विधान कंगनानं केले आहे. 

शनिवारी मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बालपणावर आधारित शॉर्ट फिल्म ''चलो जीते''चा प्रीमिअर पार पडला. याचवेळी कंगनानं पत्रकारांशी संवाद साधताना हे विधान केले आहे. यावेळी तिनं पंतप्रधान मोदींचं तोंडभरुन कौतुकही केले. इतकेच नाही तर पुढे तिनं असंही म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ज्या उच्च पदावर आहेत, ते त्यांच्या आईवडिलांमुळे नाही. तर ते स्वबळावर या पदापर्यंत पोहोचले आहेत. 

(इंडिया कुटुर वीक- 2018मध्ये करिना, अदिती आणि कंगनाचा रॅम्पवॉक)

दरम्यान, 'चलो जीते'चे दिग्दर्शन मंगेश हदावले यांनी केले असून 32 मिनिटांच्या या शॉर्ट फिल्ममध्ये पंतप्रधान मोदींच्या बालपणाचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. फिल्मच्या प्रीमिअरला कंगना व्यतिरिक्त खिलाडी अक्षय कुमार, गुलशन ग्रोवर, अमिषा पटेल, संजय खान यांच्यासहीत अन्य कलाकारदेखील उपस्थित होते.  

टॅग्स :कंगना राणौतनरेंद्र मोदीबॉलिवूड