Join us

आरारारारा...खतरनाक! प्रवीण तरडेच्या अभिनयावर फिदा झाला भाईजान, ‘राधे’मध्ये लागली वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 15:20 IST

सलमान खान आणि अभिनेता, लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे ‘मुळशी पॅटर्न’च्या निमित्ताने एकत्र आलेत आणि कमाल झाली.

ठळक मुद्देप्रवीण हा अभिनेता, लेखक,दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो.

सलमान खान आणि अभिनेता, लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे ‘मुळशी पॅटर्न’च्या निमित्ताने एकत्र आलेत आणि कमाल झाली. होय, या चित्रपटाचे निमित्त झाले आणि प्रवीणला ‘राधे’ मिळाला. होय, वाचताय ते अगदी खरे आहे. भाईजानचा आगामी सिनेमा ‘राधे - योर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमात प्रवीण तरडे एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. हा प्रवीणचा पहिला मेनस्ट्रिम बॉलिवूडपट असणार आहे.

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत खुद्द प्रवीणने ही माहिती दिली. त्याने सांगितले, सलमान व मी ‘मुळशी पॅटर्न’च्या निमित्ताने एकमेकांच्या संपर्कात होतो. या चित्रपटात तो हिंदी रिमेक बनवणार आहे. ‘मुळशी पॅटर्न’ त्याने अनेकदा पाहिला होता आणि यातील माझा अभिनय पाहून कमालीचा प्रभावित झाला होता. एकदिवस त्याने मला ‘राधे’तील भूमिका ऑफर केली आणि मी त्याला क्षणाचाही विचार न करता होकार दिला. मी या चित्रपटासाठी 10-12 दिवस चित्रीकरण केले. सलमानसोबत काम करण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे.

 यावेळी सलमानसोबत काम करण्याचा अनुभव सांगायलाही तो विसरला नाही. सलमान हा पक्का महाराष्ट्रीय आहे. मराठी माणूस आहे. त्याच्या वागण्या-बोलण्यातून ते झळकते. इतकेच नाही तर तो चांगला मराठीही बोलतो, असेही प्रवीणने सांगितले.‘राधे’मध्ये प्रवीण मराठी माणसाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

प्रवीण हा अभिनेता, लेखक,दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. मराठीतील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता अशीही त्याची ओळख आहे. ‘मुळशी पॅटर्न’ हा त्याने दिग्दर्शित केलेला चित्रपट तुफान गाजला होता. यात त्याने साकारलेल्या भूमिकेचेही अमाप कौतुक झाले होते.

टॅग्स :प्रवीण तरडेसलमान खान