Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ता बर्वेचा परदेशात 'नाचं ग घुमा'! अभिनेत्रीचा जबरदस्त डान्स, व्हिडिओ एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 09:26 IST

'नाचं ग घुमा' गाण्यावर परदेशात थिरकली मुक्ता बर्वे, पाहा व्हिडिओ

सध्या जिकडे तिकडे 'नाच गं घुमा' या मराठी सिनेमाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा महिलांच्या आयुष्यावर भाष्य करणारा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'नाच गं घुमा' टीमकडून सिनेमाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. प्रदर्शनाआधीच या सिनेमाचं टायटाल साँग प्रचंड हिट ठरत आहे. 'नाच गं घुमा' हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. या गाण्यावरील रील व्हिडिओही व्हायरल होत आहेत. आता मुक्ता बर्वेने सातासमुद्रापार परदेशात 'नाच गं घुमा'वर रील बनवला आहे. 

मुक्ता बर्वेने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती परदेशात 'नाच गं घुमा' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. सध्या मुक्ता नाटकाच्या दौऱ्यानिमित्त परदेशात आहे. वॉशिंग्टन येथील स्केगिट व्हॅली ट्यूलिप फेस्टिव्हल येथे मुक्ताने पैठणी ड्रेस घालून मराठमोळ्या अंदाजात 'नाच गं घुमा'वर रील बनवला आहे. या व्हिडिओत तिच्याबरोबर नाटकाची टीमही गाण्याच्या हुक स्टेप करताना दिसत आहे. मुक्ताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

'नाच गं घुमा' या सिनेमात मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत आहे. तिच्याबरोबर नम्रता संभेराव, सुकन्या मोने, सारंग साठ्ये, बालकलाकार मायरा वायकूळ, मधुगंधा कुलकर्णी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. परेश मोकाशी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून १ मेला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :मुक्ता बर्वेसिनेमासेलिब्रिटी