Join us
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! 'शक्तिमान' सिनेमासाठी इतके कोटी खर्च होणार, मुकेश खन्नांनी केला चित्रपटाबद्दल खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 09:51 IST

अभिनेते मुकेश खन्ना यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर शक्तिमान फिल्मसंबंधी खुलासा केला.

90 च्या दशकात मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांच्या 'शक्तिमान' मालिकेतून भारताला पहिला सुपरहिरो मिळाला. शो संपल्यानंतर मुकेश खन्ना यांनी यावर फिल्म बनवण्याचे ठरवले. खरंतर गेल्या अनेक वर्षांपासून यावर फिल्म येईल अशी चर्चा आहे. नुकतंच मुकेश खन्ना यांनी यासंबंधी माहिती दिली. ही फिल्म इंटनरॅशनल लेव्हलची असेल आणि यासाठी करोडो रुपये खर्च होतील असं त्यांनी सांगितलं आहे.

अभिनेते मुकेश खन्ना यांनी स्वत:चे युट्यूब चॅनल भीष्म इंटरनॅशनल वर शक्तिमान फिल्मसंबंधी खुलासा केला. ते म्हणाले, " शक्तिमान शोला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी मोठा प्लॅन बनवला आहे. फिल्मसंबंधी कॉन्ट्रॅक्ट तयार असून यासाठी सुमारे २०० ते ३०० कोटींचा खर्च येणार आहे. सोनी पिक्चर्स फिल्मची निर्मिती करेल ज्यांनी स्पायडरमॅन फिल्म बनवली होती."

'फिल्म तयार होण्यासाठी खूप वेळ लागतोय. आधी कोव्हिडमुळे  काम थांबले. पण आता विश्वास ठेवा ही फिल्म नक्की बनणार. यामध्ये मुख्य भूमिकेत कोण असणार हे मी आत्ताच सांगणार नाही. ही एक कमर्शियल फिल्म आहे. पण मी या फिल्ममध्ये असणार. माझ्याशिवाय फिल्म पूर्ण कशी होईल,' असंही ते म्हणाले. मात्र मुकेश खन्ना यांनी अद्याप फिल्मच्या स्टारकास्ट आणि दिग्दर्शकासंबंधी खुलासा केलेला नाही. सिनेमासाठी आधी रणवीर सिंहच्या नावाची जोरदार चर्चा होती.

मुकेश खन्ना यांनी 'शक्तिमान' आणि 'भीष्म पीतामह' सारख्या भूमिका गाजवल्या आहेत. आता त्यांच्या 'शक्तिमान' सिनेमाची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. फक्त काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.

टॅग्स :मुकेश खन्नाटिव्ही कलाकारबॉलिवूडसिनेमा