Join us

'G.O.A.T' सिनेमात महेंद्रसिंग धोनीला पाहताच प्रेक्षकांनी थिएटर घेतलं डोक्यावर, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 18:26 IST

थलापती विजयच्या 'G.O.A.T' सिनेमात धोनीला पाहताच प्रेक्षकांनी थिएटरमध्ये एकच कल्ला केलेला दिसला

भारताचा 'कॅप्टन कूल' अशी ओळख असलेला क्रिकेटपटू म्हणजे महेंद्रसिंग धोनी. धोनी चक्क सिनेमात झळकला ही हेडलाईन वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला ना? पण तुम्ही ऐकताय ते खरंय. महेंद्रसिंग धोनी थलापती विजयच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'G.O.A.T' सिनेमात झळकला आहे. अवघ्या काही सेकंदात धोनीला मोठ्या पडद्यावर पाहून प्रेक्षकांनी थिएटर अक्षरश: डोक्यावर घेतलं.

धोनी 'G.O.A.T' मध्ये कोणत्या भूमिकेत?

थिएटरमध्ये ''G.O.A.T'  हा सिनेमा बघणाऱ्या लोकांनी सिनेमातल्या सीनचा व्हिडीओ पोस्ट करुन ती क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केलीय. सिनेमात धोनी CSK ची जर्सी घालून खेळताना दिसला आहे. धोनीने IPL मध्ये CSK जर्सी घालून जी खेळी केली, त्याभोवती सिनेमाचा एक सीन रचण्यात आलाय. थलापती विजय सुद्धा या खास सीनमध्ये दिसला आहे. धोनी मोठ्या स्क्रीनवर दिसताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. प्रेक्षकांनी थिएटर अक्षरशः डोक्यावर घेतलं.

थलापती विजयच्या 'द गोट लाईफ' विषयी

'G.O.A.T' सिनेमात थलापती विजय प्रमुख भूमिकेत आहे. या सिनेमात विजय बहुरुपी भूमिकेत दिसतोय. गेल्या अनेक वर्षांपासून या सिनेमाची चर्चा आहे. दररोज हा सिनेमा ट्विटरवर ट्रेंडींगला असतो. अखेर हा सिनेमा रिलीज झालाय. ''G.O.A.T' मध्ये विजयने साकारलेल्या भूमिकेचं कौतुक होतंय. सिनेमावर सुद्धा संमिश्र प्रतिक्रिया येत असून हा मसाला एंटरटेनमेंट असलेला सिनेमा अनेकांना आवडलेला दिसतोय.

 

 

टॅग्स :एम. एस. धोनीTollywood