Join us  

गौतमीच्या लग्नानंतर भावूक झाली मृण्मयी देशपांडे; सुखी संसारासाठी दिला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 12:53 PM

 गौतमीने स्वानंद तेंडुलकरबरोबर २५ डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधली.

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि तिची धाकटी बहीण गौतमी देशपांडे यांचे अनेक चाहते आहेत. दोन्ही बहिणींनी आपल्या अभिनयाने सर्वांना जिंकून घेतलं. दोघींमध्ये असलेल्या सुंदर बॉण्डिंगचं नेहमीच कौतुक केलं जातं. नुकतेच  गौतमीने स्वानंद तेंडुलकरबरोबर (२५ डिसेंबर) लग्नगाठ बांधली. आता धाकट्या बहिणीच्या लग्नानंतर मृण्मयीने खास पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा आणि मोलाचा सल्ला दिला आहे.

मृण्मयीने लिहले, 'अजूनही विश्वास बसत नाहीये की गौतमीचं लग्न झालं... प्रत्येक गोष्टीमध्ये ताई हवी असणारी माझी बहीण स्वतःच्या संसाराला लागली... या क्षणी नक्की काय वाटतंय ते शब्दात सांगता येत नाहीये... आनंद..काळजी..आता ती officially दुसऱ्याची झाली याचं दुःख.. आणि तिच्या मनासारखा जोडीदार मिळाल्याचा आनंद.. सगळ्याच भावना एकत्र आल्या आहेत... काल परवा पर्यंत ताईचे शेपूट असणार आमचं बाळ ‘संसार’ करताना बघणं मजेचं असणार आहे.. यापुढे आम्हा बहिणींची gossips एकतर्फी नसतील आणि कदाचित तिचा संसार सुरू झाल्यावर ,”ताई तुला माझ्यासाठी वेळच नसतो..” ही तिची तक्रार संपेल... कारण..? तिचं तिलाच कळेल!'

मृण्मयीने स्वानंदलाही सल्ला दिला. ती म्हणते, 'स्वानंद.. तुझं वेगळं स्वागत करण्याची गरज नाहीये... लग्नाआधीच तू फॅमिली मेंबर झाला होतासच... गौतमी स्वानंद ची काळजी घे... स्वानंद गौतमची साथ सोडू नकोस... संसार कोणाचाच सोपा नसतो.. पण एक दुसऱ्याचा हात घट्ट पकडलेला असला की कुठल्याही अडचणी वरती मात करता येते.. कदाचित सहज नाही... पण मात करता येते!!'

पुढे मृण्मयीने लिहते, 'एकमेकांवर विश्वास असू द्या... संवाद असू द्या... नातं किंवा प्रेम असंच टिकत नाही त्यासाठी दोघांनीही कष्ट घेण्याची गरज असते... एकमेकांच्या प्रेमात पडण्याची नवीन कारणं शोधत रहा... एकमेकांना सांभाळून घ्या... आता फक्त तुम्ही दोघं नाही आहात दोन्ही कुटुंब एकत्र आली आहेत.. सगळ्यांची काळजी घ्या... आणि मी एवढं प्रेमाने बोलून सुद्धा, एवढं छान लिहून सुद्धा वेड्यासारखे वागलात, तर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेवा!!!! लै हनीन', या शब्दात मृण्मयीने आपल्या लाडक्या बहिणीला संसार म्हणजे काय आणि प्रेम कसे टिकवायचे याबाबत महत्त्वाचा सल्ला दिला. 

टॅग्स :मृण्मयी देशपांडेगौतमी देशपांडेसेलिब्रिटीमराठी अभिनेता