Join us
Daily Top 2Weekly Top 5

सिनेमा रिलीज होताच मृणाल ठाकूर सिद्धिविनायकाच्या दर्शनाला; पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 16:49 IST

मृणाल ठाकूरनं सिनेमाच्या यशासाठी बाप्पाचं दर्शन घेत आशीर्वाद घेतले आहेत.

बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अभिनय कौशल्य दाखवणारी अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या 'फॅमिली स्टार' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार विजय देवराकोंडा महत्त्वाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट ५ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला असून सिनेमाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. चित्रपटाच्या यशासाठी मृणाल ठाकूर संपूर्ण कुटुंबासह सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचं आशीर्वाद घेण्यासाठी पोहचली.

मृणाल ठाकूरनं सिनेमाच्या यशासाठी बाप्पाचं दर्शन घेत आशीर्वाद घेतले आहेत. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मृणाल पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि डेनिम जीन्समध्ये दिसत आहे. चाहत्यांना तिचा साधा लुक आवडला. मृणालची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी सिद्धिविनायक मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. मृणाल सध्या 'फॅमिली स्टार' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

बाप्पाचे आशीर्वाद घेतल्यानंतर मृणालनं पापाराझींशीही संवाद साधला. ती म्हणाली, 'हा तिचा पहिला रोम-कॉम चित्रपट आहे. गाण्यांसोबतच चित्रपटाची कथाही प्रेक्षकांना आवडत आहे'. यासोबतच हा 'फॅमिली स्टार' चित्रपट लवकरच हिंदीतही प्रदर्शित होणार असल्याचं तिनं सांगितलं.मृणाल ठाकूर आणि विजय देवरकोंडा यांचा 'फॅमिली स्टार' हा सिनेमा तामिळ आणि तेलुगुमध्ये रिलीज झाला आहे. सिनेमानं पहिल्या दिवशी 5.75 कोटींचा व्यवसाय केला. तर दुसऱ्या दिवशी 3.2 कोटींचा गल्ला जमवला. अशा परिस्थितीत या चित्रपटाची आतापर्यंतची एकूण कमाई 8.95 कोटी रुपये झाली आहे.

टॅग्स :मृणाल ठाकूरविजय देवरकोंडा