Join us

'सोनपरी'चा आज ५२ वा वाढदिवस, सून शिवानीची खास पोस्ट; म्हणाली, 'ताई तुला...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 09:08 IST

मृणाल आणि सून शिवानी यांचा बॉंड सासू सूनेपेक्षा मैत्रिणीसारखा जास्त आहे.

मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni)  आज ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे. 'सोनपरी' म्हणून लहान मुलांमध्ये ओळख असलेली, तर 'अवंतिका' नावाने सर्व महिलांमध्ये लोकप्रिय असलेली अशी ही चिततरुण अभिनेत्री. मृणाल कुलकर्णी यांच्या सौंदर्याची तारीफ करावी तितकी कमीच आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेकजण शुभेच्छा देत आहेत. मृणाल यांची सून शिवानी रांगोळेनेही (Shivani Rangole) खास पोस्ट शेअर केली आहे.

मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस कुलकर्णीने गेल्या वर्षी अभिनेत्री शिवानी रांगोळेशी लग्नगाठ बांधली. अशा प्रकारे मृणाल कुलकर्णी खऱ्या आयुष्यात सासूच्या भूमिकेत गेल्या. सून शिवानीचं त्या नेहमीच कौतुक करताना दिसतात. तर आज त्यांच्या या खासदिवशी शिवानीने पोस्ट शेअर केली आहे. ती लिहिते, 'ताई, वाढदिवसाच्या शुभेच्छा! माझी मैत्रिण, मला आत्मविश्वास देण्यासाठी आणि नेहमीच पाठिंबा देण्यासाठी धन्यवाद. ती ज्याप्रकारे प्रत्येकाच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवते आणि तुझी ऊर्जा राखतच सर्वांना आनंदित ठेवते हे खूप प्रेरणा देणारे आहे. तुझे भरपूर वाढदिवस अशाच प्रकारे प्रेम आणि शांततेने जावो!

शिवानी रांगोळेच्या या पोस्टवर सासू मृणाल कुलकर्णींनी आभार मानलेत. मृणाल आणि सून शिवानी यांचा बॉंड सासू सूनेपेक्षा मैत्रिणीसारखा जास्त आहे. तसंच ती मृणाल यांना 'ताई' असं म्हणते हेही या पोस्टमधून दिसतं. शिवानी आणि विराजस बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. लग्नाआधी ते बराच काळ डेटही करत होते. त्यामुळे मृणाल यांच्याशी तिची ओळख आधीपासूनच होती. सध्या शिवानी 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत व्यस्त आहे. तर मृणाल कुलकर्णीही सिनेमांमध्ये काम करत आहेत.

 

टॅग्स :मृणाल कुलकर्णीमराठी अभिनेताशिवानी रांगोळेसोशल मीडिया