Join us
Daily Top 2Weekly Top 5

मिस्टर इंडिया या चित्रपटातील टीना आता दिसते अशी, तितकीच सुंदर आजही दिसते ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 06:30 IST

मिस्टर इंडिया या चित्रपटात टीनाच्या भूमिकेत दिसलेल्या अभिनेत्रीचे नाव होजान खोदाईजी असे होते.

ठळक मुद्देहोजान लहानपणी जितकी सुंदर दिसत होती, तितकीच ती आज देखील सुंदर दिसते. ती आता एका जाहिरातीच्या कंपनीत काम करत असून आहे.

मिस्टर इंडिया हा चित्रपट एकेकाळी चांगलाच गाजला होता. या चित्रपटात अनिल कपूर, श्रीदेवी यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटात अमरिश पुरी यांनी मोगॅम्बो ही भूमिका साकारली होती. त्यांच्या या चित्रपटातील मोगॅम्बो खूश हुआ हा संवाद चांगलाच गाजला होता. या चित्रपटात अनेक बालकलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. या चित्रपटातील चिमुकली टीना तर प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. तिचे चेहऱ्यावरचे गोंडस भाव प्रेक्षकांना प्रचंड भावले होते. या चित्रपटातील या टीनाविषयी आम्ही आज काही खास गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत.

मिस्टर इंडिया या चित्रपटात टीनाच्या भूमिकेत दिसलेल्या अभिनेत्रीचे नाव होजान खोदाईजी असे होते. होजान लहानपणी जितकी सुंदर दिसत होती, तितकीच ती आज देखील सुंदर दिसते. ती आता एका जाहिरातीच्या कंपनीत काम करत असून तिने स्कूपवूफला काही वर्षांपूर्वी सांगितले होते की, माझे पालकांचे एख फ्रेंड कास्टिंग डायरेक्टर होते. त्यामुळे मला त्यांना मला या चित्रपटाबद्दल सांगितले होते, या चित्रपटासाठी ऑडिशन दिल्यानंतर माझी या भूमिकेसाठी निवड करण्यात आली. या चित्रपटानंतर मी काही जाहिरातींमध्ये देखील काम केले. 

या चित्रपटातील भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा अनुभव कसा होता याविषयी होजानने सांगितले की, या चित्रपटातील अनेक दृश्यात तुम्हाला मला रडताना पाहायला मिळाले आहे. या चित्रपटातील कोणत्याच दृश्यासाठी मी ग्लिसरीन वापरलेले नाही. मी सगळ्याच सीनमध्ये खरेखुरी रडले आहे. मला एका भल्या मोठ्या कागदावर खूप सारे संवाद लिहून दिले जात असे. ते संवाद पाहूनच मला रडायला यायचे.

 

टॅग्स :अनिल कपूर