Join us

Mouni Roy ने बिकीनीतील फोटो केला शेअर, बोल्ड अंदाज पाहून फॅन्स झाले घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2020 14:08 IST

मौनीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोत ती बिकीनी घालून एका रिक्लायनिंग चेअरवर लेटलेली दिसत आहे.

अभिनेत्री मौनी रॉयने शनिवारी एक शानदार बिकीनी फोटो पोस्ट केला असून या फोटोची चांगलीच चर्चा रंगली आहे. या फोटोतील तिच्या परफेक्ट कर्वची फॅन्स भरभरून कौतुक करत आहेत. मौनीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोत ती बिकीनी घालून एका रिक्लायनिंग चेअरवर लेटलेली दिसत आहे.

या फोटोच्या कॅप्शनला तिने लिहिले की, 'शनिवार झोप घेण्यासाठी आहे आणि रविवार मिठी मारण्यासाठी आहे'. मौनी हा फोटो शेअर केल्यावर काही वेळात ७४५,५०० पेक्षा अधिक लाइक्स मिळाले आहेत.

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर मौनी अयान मुखर्जीच्या अ‍ॅक्शन फॅंटसी ड्रामा 'ब्रम्हास्त्र'मध्ये दिसणार आहे. या सिनेमात रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन आणि तेलुगू सुपरस्टार नागार्जुन दिसणार आहेत. 

मौनी रॉय नुकतीच मालदीव्सला फिरायला गेली होती. तेथील तिचे बिकीनीचे फोटोही व्हायरल झाले होते. आता तिचे फॅन्स तिच्या सिनेमाची वाट बघत आहेत.  

टॅग्स :मौनी राॅयबॉलिवूड