Join us

मौनी रॉयचा 'बिकिनी फोटो' अशनीर ग्रोव्हरनं 'लाईक' केला; बायकोने 'बदाम' पाहिला, अन्....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 14:29 IST

एकदा मौनी रॉयचा बिकिनीतील फोटो लाईक केला आणि त्यानंतर काय झालं याचा किस्सा अशनीर ग्रोव्हर यांनी सांगितला आहे.

देशातील प्रसिद्ध व्यवसायिक आणि शार्क टँक इंडियाच्या पहिल्या सीझनचे जज अशनीर ग्रोव्हर आपल्या शैलीसाठी ओळखले जातात. पहिल्या पर्वातील त्यांचे अनेक डायलॉग गाजलेही होते. आता पुन्हा एकदा अशनीर ग्रोव्हर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यांनी आपल्याबाबत घडलेला एक किस्सा सांगितला. तो ऐकल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही. एका मुलाखतीत अशनीर ग्रोव्हर यांनी आपण आपल्या पत्नीला घाबरतो असं म्हटलं. एकदा त्यांनी अभिनेत्री मौनी रॉय हीचा बिकिनीतील फोटो लाईक केला होता. त्यानंतर त्यांची पत्नी माधुरी जैन त्यांच्यावर भडकल्या होत्या.

अशनीर ग्रोव्हर यांच्या अनोख्या शैलीचे सोशल मीडियावर अनके चाहते आहेत. त्यांच्या मुलाखतीतील काही गंमती जमतीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशनीर ग्रोव्हर आणि त्यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोव्हर यांनी नुकतीच अभिनेत्री अमृता राव आणि तिचा पतीन आरजे अनमोल यांची भेट घेतली. यादरम्यान त्यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.

अशनीर ग्रोव्हरनं सांगितला किस्साआपल्या पत्नीसमोर आपलं काहीच चालत नाही, असं अशनीर ग्रोव्हर म्हणाले.  माधुरी यांच्यासोबतचं तुमचं नातं कसं आहे? असा सवाल त्यांना मुलाखतीदरम्यान करण्यात आला. यावर उत्तर देताना आपण तिला घाबरत असल्याचे ते म्हणाले. एकदा इन्स्टाग्रामवर मौनी रॉयचा बिकिनीतील फोटो लाईक केला होता. मी इन्स्टावर अनेक लोकांना फॉलो करतो. मी मौनी रॉयलाही फॉलो करतो. तिनं बिकिनीतील फोटो टाकला तो मी लाईक केला. जेव्हा मी घरी आलो तेव्हा माधुरी रागात बसली होती. यानंतर मी मौनी रॉयला इन्स्टावरून अनफॉलो केल्याचं अशनीर यांनी सांगितलं. यावर माधुरी जैन यांनीदेखील मिश्किल उत्तर दिलं. त्यांनी फोटो लाईक केला यात कोणतीही समस्या नाही. परंतु ती बिकिनीत आहे, तुम्ही का लाईक केल? असं त्यांनी सांगितलं.

टॅग्स :टेलिव्हिजनइन्स्टाग्राममौनी राॅय