Join us
Daily Top 2Weekly Top 5

खऱ्या अर्थानं हिरो... 'हा' अभिनेता सैन्यात लेफ्टनंट कर्नल, ५ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहेत नावावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 15:35 IST

एका लोकप्रिय सुपरस्टारनं अभिनयासोबतच देशाची सेवाही केली आहे.

बॉलिवूडपासून ते साऊथपर्यंत अनेक अभिनेत्यांना आपण पडद्यावर सैनिकाची भूमिका साकारताना पाहिलं आहे. पण, एका सुपरस्टारच्या बाबतीत गोष्ट जरा हटके आहे. त्या अभिनेत्यानं केवळ चित्रपटांमध्ये नाही तर प्रत्यक्ष देश सेवेतही आपली जबाबदारी अत्यंत निष्ठेने पार पाडली आहे. ते अभिनेते आहेत मोहनलाल. त्यांनी प्रादेशिक सेनेत लेफ्टनंट कर्नल म्हणूनही सेवा बजावली आहे.

मोहनलाल यांना २००९ मध्ये भारतीय लष्कराच्या टेरिटोरियल आर्मी (प्रादेशिक सेना) मध्ये 'लेफ्टनंट कर्नल' ही मानद पदवी मिळाली. हा मान मिळवणारे ते पहिले भारतीय अभिनेते आहेत. या मानद पदवीसह ते गेल्या १६ वर्षांहून अधिक काळापासून देशाची सेवा करत आहेत. अलीकडेच त्यांनी भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची भेट घेतली, तेव्हा लष्करानेही त्यांच्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले होते.

२१ मे १९६० रोजी केरळमध्ये जन्मलेल्या मोहनलाल यांनी १९८० मध्ये अभिनयाला सुरुवात केली. ते फक्त मल्याळमच नाही, तर तमिळ, तेलगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्येही दिसले आहेत. चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना पद्मभूषण आणि पद्मश्री यांसारखे मोठे सरकारी सन्मान मिळाले आहेत. त्यांच्या नावावर पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची नोंद आहे. मोहनलाल यांनी ४०० हून अधिक चित्रपटांत काम केलं आहे. 

किती संपत्तीचे मालक?एका रिपोर्टनुसार, मोहनलाल यांची एकूण संपत्ती सुमारे ४२७ कोटी रुपये आहे. त्यांच्या व्यवसायात रेस्टॉरंट, हॉस्पिटल आणि चित्रपटसृष्ट्रीतील गुंतवणूक यांचा समावेश आहे. त्यांच्याकडे महागड्या गाड्या आणि आलिशान घरे देखील आहेत. मोहनलाल हे अभिनयात सुपरस्टार आणि देशाच्या सेवेत अधिकारी अशी दुहेरी भूमिका यशस्वीरित्या सांभाळत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Real Hero: This Actor is Lieutenant Colonel in Army

Web Summary : Actor Mohanlal serves India as Lieutenant Colonel in the Territorial Army. He received the honorary rank in 2009 and has served for over 16 years. With five National Film Awards, he owns investments across various sectors and assets worth ₹427 crore, balancing acting and service.
टॅग्स :सेलिब्रिटीTollywood