Join us

मिथुन चक्रवर्तीच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 04:57 IST

२०१५ पासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. त्याने तिला घरी बोलावून शीतपेयात नशेचे पदार्थ मिसळून नंतर लैंगिक अत्याचार केला. तिने जाब विचारला असता लग्नाचे वचन दिले. पुढे अनेकदा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

ठळक मुद्दे२०१५ पासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते.त्याने तिला घरी बोलावून शीतपेयात नशेचे पदार्थ मिसळून नंतर लैंगिक अत्याचार केला.मिथुन यांच्या पत्नी योगिता बाली यांच्यावरही गर्भपात करण्यास जबरदस्ती केल्याचा पीडित अभिनेत्रीचा आरोप आहे.

मुंबई : बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाअक्षय याच्यावर बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मिथुन यांच्या पत्नी योगिता बाली यांच्यावरही गर्भपात करण्यास जबरदस्ती केल्याचा पीडित अभिनेत्रीचा आरोप आहे. या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांनी सांगितले.

२०१५ पासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. त्याने तिला घरी बोलावून शीतपेयात नशेचे पदार्थ मिसळून नंतर लैंगिक अत्याचार केला. तिने जाब विचारला असता लग्नाचे वचन दिले. पुढे अनेकदा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तिला दिवस गेले तेव्हा त्याने गर्भपाताची जबरदस्ती केली. तशा गोळ्याही दिल्या. योगिता यांनी धमकावले, गर्भपातासाठी जबरदरस्ती केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :मिथुन चक्रवर्तीबॉलिवूड