Join us

प्रतिक्षा संपली! आली रे आली 'मिर्झापूर २' ची रिलीज डेट आली, पंकज त्रिपाठी-अली फजल पुन्हा करणार धमाका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 09:28 IST

मिर्झापूर २ चं पोस्ट प्रॉडक्शनचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. हा शो यूपीतील अंडरग्राउंड माफियाची कहाणी दाखवतं. यात माफियांमधील भांडणं, मारझोड, खून-खराबा, बोल्ड सीन्स प्रेक्षकांना फारच पसंत पडले होते.

Amazon Prime वरील सर्वात लोकप्रिय वेबसीरीजपैकी एक असलेल्या 'मिर्झापूर'च्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. या सीरीजच्या दुसऱ्या सीझनची रिलीज डेट समोर आली आहे. गेल्या वर्षभरापासून या वेबसीरीजच्या दुसऱ्या सीझनची फॅनस आतुरतेने वाट बघत होते. आधी बातमी आली होती की, 'मिर्झापूर २' एप्रिल २०२० मध्ये रिलीज होईल. पण असं झालं नाही. आता ताज्या रिपोर्टनुसार, 'मिर्झापूर २' आता सप्टेंबरमध्ये रिलीज होणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिर्झापूर २ OTT प्लॅटफॉर्मवर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात रिलीज होईल. मिर्झापूरचा पहिला सीझन २०१८ मध्ये आला होता. ही हिंदीतील दुसरी सर्वात लोकप्रिय वेबसीरीज ठरली होती. ही वेबसीरीज फारच लोकप्रिय ठरली होती. ज्यावर जोक्स, मीम्सही तयार झाले होते. कथेत पुढे काय होणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

अशी माहिती आहे की, मिर्झापूर २ चं पोस्ट प्रॉडक्शनचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. हा शो यूपीतील अंडरग्राउंड माफियाची कहाणी दाखवतं. यात माफियांमधील भांडणं, मारझोड, खून-खराबा, बोल्ड सीन्स प्रेक्षकांना फारच पसंत पडले होते. तसेच यातील भूमिका करणारे पंकज त्रिपाटी, अली फजल, विक्रांत मेसी, श्वेता त्रिपाठी, श्रिया पिळगावकर यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.

काही दिवसांपूर्वीच मिर्झापूर २ च्या स्टार कास्टने डबिंग करतानाचा त्यांचा फोटो शेअर केला होता. गोलूची भूमिका साकारणारी श्वेता त्रिपाठीने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली होती की, ती मिर्झापूरच्या फॅन्ससाठी जीवाची बाजी लावत डबिंग करायला पोहोचली आणि शो लवकर प्रेक्षकांना बघायला मिळणार.

टॅग्स :मिर्झापूर वेबसीरिजपंकज त्रिपाठीवेबसीरिजअली फजल