Join us
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेकअपची चर्चा करणा-यांना मिलिंद सोमणचे सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2018 16:48 IST

मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमणची प्रेमात फसवणूक झाल्याची चर्चा कालपासून रंगली होती. पण स्वत: मिलिंद सोमण आणि त्याची गर्लफ्रेन्ड अंकिताने ही चर्चा करणा-यांना सडेतोड उत्तर दिलंय.

मुंबई : मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमणची प्रेमात फसवणूक झाल्याची चर्चा कालपासून रंगली होती. 52 वर्षांच्या मिलिंदला 25 वर्षांनी लहान तरुण असलेली गर्लफ्रेण्ड अंकिता कोवरने 'डिच' केल्याचं वृत्त होतं. पण स्वत: मिलिंद सोमण आणि त्याची गर्लफ्रेन्ड अंकिताने ही चर्चा करणा-यांना सडेतोड उत्तर दिलंय.

अशी चर्चा सुरु होती की, मिलिंदला त्याच्या गर्लफ्रेन्डने पैशांसाठी सोडलं. पण दोघांनीही ही चर्चा करणा-यांची एक शब्दही न बोलता तोंड बंद केली आहेत. 

मिलिंद सोमण याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक अंकिता आणि त्याचा फोटो शेअर केला असून #focus #BetterHabits4BetterLife #surroundedbylove अशाप्रकारचे हॅशटॅग दिले आहेत. यावरुनही दोघांमध्ये सगळं ठिक सुरु असल्याचं दिसतंय.

त्याआधी अंकिताने त्यांच्याबद्दलची चर्चा सुरु झाल्यावर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला असून त्याला माय मॅन, लव्ह असे हॅशटॅग दिले आहेत. हे शेअर करुन तिने दोघांमध्ये सगळंकाही ठिक असल्याचं सांगितलं आहे.

मिलिंद सोमण याने काही सिनेमे आणि टीव्ही शो केले आहेत. मराठी, तेलुगू, तामीळ, इंग्लिश, जपानी, जर्मन, फ्रेंच, स्वीडिश यांसह अनेक चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे. अंकिता आणि मिलिंद 21 एप्रिलला विवाहबंधनात अडकणार होते. अलिबागमध्ये मोजके मित्र-मैत्रिण आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार होता. पण याबाबत अधिकृत काहीही सांगण्यात आलं नाहीये.

टॅग्स :मिलिंद सोमण बॉलिवूड