Join us

"त्याला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही" मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 12:48 IST

आता येत्या २५ एप्रिलला 'झापुक झुपूक' हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

Suraj Chavan Zapuk Zupuk: 'बिग बॉस मराठी' विनर आणि रीलस्टार असलेल्या सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' (Zapuk Zupuk)  चित्रपट येत्या २५ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्यावर्षी म्हणजेच डिसेंबर २०२४ मध्ये या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला होता. त्यानंतर मार्च महिन्याच्या सुरुवातीला या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं. या सिनेमातून सूरज चव्हाणच्या आयुष्यातील संघर्ष दाखवण्यात येणार आहे. यात चित्रपटातील तगड्या कलाकारांची फौज आहे. या सिनेमातून अभिनेता मिलिंद गवळी (Milind Gawali ) मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. काल बहुप्रतिक्षीत 'झापुक झुपूक'चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलर लाँच सोहळ्यानंतर मिलिंद गवळींनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

मिलिंग गवळींनी ट्रेलर लाँच सोहळ्यातील काही खास क्षणांचा व्हिडीओ शेअर केलाय. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहलं, "गणपती बाप्पा मोरया. काल सिद्धिविनायक गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन मग "झापुक झुपूक" चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. दिग्दर्शक केदारजी शिंदे आणि जिओ स्टुडिओचे निखिलजी साने यांच्यासोबत आम्ही सिनेमातले सगळे कलाकार सिद्धिविनायक गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला गेलो. काल दर्शनाला भाविकांची खूप गर्दी होती, त्यामुळे आम्ही सगळे कलाकार गाभाऱ्यात थोडा वेळ बसलो, तिथे सिद्धिविनायक गणपती बाप्प च्या माझ्या लहानपणा पासूनच्या दर्शनाच्या आठवणी मला येऊ लागल्या, याच सिद्धिविनायक बापाला माझ्या आईने माझ्यासाठी अनेक नवस बोलले, आणि अनेक वेळा ते नवस फेडायला ती मला सिद्धिविनायकाच्या दर्शनाला घेऊन गेली, पूर्वी मी सुद्धा अनेक गोष्टींसाठी बाप्पाकडे हट्ट केला आहे, आणि अशी एकही गोष्ट नाही जी बाप्पाने मला दिली नाही की ती पूर्ण केली नाही".

पुढे त्यांनी लिहलं,  "पण आता मी बापाकडे माझ्या स्वतःसाठी काहीच मागत नाही, एवढेच मागत असतो की सगळ्यांना सुखी ठेव, सगळ्यांना आनंदी ठेव, सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण कर. पूर्वी जसा माझ्या मराठी चित्रपटाच्या रीळाचे डब्बे घेऊन मी निर्मात्यांबरोबर शिर्डी, शेगाव, अक्कलकोटला जायचो, तसंच अनेक वर्षांनी आज पुन्हा "झापुक झुपूक" च्या निर्मात्या दिग्दर्शकांबरोबर सिद्धिविनायकला आलो, श्रद्धेने कुठलीही गोष्ट केलेली यशस्वी होतेच. परमेश्वर खूप मोठा आहे, त्याच्यासमोर आपण खूप लहान आहोत, ज्याला परमेश्वराचा आशीर्वाद मिळाला. त्याला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, सिनेमाची ही कलाकृती करणं सोपं नाहीये, आणि ती जर यशस्वी झाली, तर अनेक कलाकार, तंत्रज्ञ, यांचं आयुष्यभरासाठी करिअर घडत असतं. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया", या शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या.  

टॅग्स :मिलिंद गवळीसिद्धिविनायक गणपती मंदिरमराठी अभिनेता