Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनंत अंबानींच्या साखरपुड्यात मिका सिंगचं गाणं, १० मिनिटांसाठी १.५ कोटी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 16:03 IST

मिका सिंगने या साखरपुडा सोहळ्याला केवळ १० मिनिटांचा परफॉर्मन्स शो केला

मुकेश अंबानींच्या घरात पुन्हा एकदा लगीनघाई सुरु झाली आहे. मुकेश अंबानींचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानीचे लग्न होत असून नुकतेच त्यांचा साखरपुडा झाला. राधिका मर्चंट या अंबानी कुटुंबाच्या धाकट्या सून होणार आहेत. अंबानी कुटुंबातील या साखरपुडा सोहळ्याला बॉलिवूडमधील सिनेस्टारसह उद्योग आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची हजेरी होती. २९ डिसेंबर रोजी हा साखरपुडा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. बॉलिवूडचा सिंगर मिका सिंगने आपल्या गाण्यांनी समारंभ अधिक शानदार केला.

मिका सिंगने या साखरपुडा सोहळ्याला केवळ १० मिनिटांचा परफॉर्मन्स शो केला. मात्र, या १० मिनिटांसाठी तब्बल दीड कोटी रुपयांचे मानधन घेतल्याचे मीडिया रिपोर्टनुसार समजते. सहसा १ तासाच्या शोसाठी मिका एवढे पैसे घेतो. मात्र, अंबानींच्या साखरपुडा सोहळ्यात १० मिनिटांतच त्याने कार्यक्रम आटोपला. तरीही तेवढीच फी घेतली. यापूर्वी आकाश अंबानींच्या लग्नातही मिकाने गाणे गायले होते. त्यामुळे, अंबानींच्या कौटुंबिक कार्यक्रमात मिका सिंगचा शो ठरलेलाच असतो. 

कोण आहेत राधिका मर्चंट

राधिका या एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ आणि व्हाईस-चेअरमन वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे. राधिका मर्चंट यांनी न्यूयॉर्क विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे आणि एओ पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक्स ग्रॅज्युएट आहे. राधिकाचे कुटुंब अंबानी कुटुंबाला अनेक वर्षांपासून ओळखते आणि राधिका या देखील नीता अंबानींच्या खूप जवळ आहेत. अलीकडेच नीता अंबानी या देखील राधिकाच्या शास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमात उपस्थित होत्या आणि दोघेही स्टेजवर एकत्र दिसले होते.

टॅग्स :मुकेश अंबानीमिका सिंगबॉलिवूड