Join us
Daily Top 2Weekly Top 5

#MeToo : तुम्ही साजिदच्याच मागे लागू नका...! किरण खेर व मलायका अरोरा भडकल्या!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2018 09:45 IST

‘इंडियाज् गॉट टॅलेंट 8’च्या पत्रपरिषदेत साजिदबद्दलच्या प्रश्नांना उत्तर देताना मलायका व किरण खेर यांची चांगलीच दमछाक झाली.

दिग्दर्शक साजिद खानवर झालेल्या गैरवर्तनाच्या आरोपानंतर त्याचे कुटुंबचं नाही तर त्याच्या जवळच्या लोकांच्या समस्याही वाढल्या आहेत. साजिद खानवर ठेवण्यात आलेल्या आरोपांना काय उत्तर द्यावे, या धर्मसंकटात अनेकजण सापडले आहेत. अशीच काही परिस्थिती ओढवली ती ‘इंडियाज् गॉट टॅलेंट 8’च्या जज किरण खेर आणि मलायका अरोरा यांच्यावर. ‘इंडियाज् गॉट टॅलेंट 8’च्या पत्रपरिषदेत साजिदबद्दलच्या प्रश्नांना उत्तर देताना मलायका व किरण खेर यांची चांगलीच दमछाक झाली.यावर बोलताना किरण खेर यांनी साजिदच्या मागे लागू नका, अशी प्रतिक्रिया दिली. 

मी साजिदला अनेक वर्षांपासून ओळखते. माझ्यासोबत असे काही घडत नाही, तोपर्यंत मी अशा कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. यात किती सत्य आहे, किती खोटे हे केवळ साजिदचं सांगू शकतो किंवा मग आरोप लावणारे़, असे किरण खेर म्हणाल्या. यानंतर किरण खरे व मलायका अरोरा यांच्या पीआर टीमने मीडियाला याबदद्ल प्रश्न न विचारण्याची विनंती केली. पीआर टीमला मध्येच थांबवत, मला मीटूवर बोलण्यास काहीही अडचण नाही, असे किरण खेर म्हणाल्या. यानंतर दुसऱ्या पत्रकारानेही मीटूबद्दल प्रश्न केला़ हे पाहून किरण खरे व मलायका अरोरा काहीशा संतापल्या. तुम्ही लोक साजिदच्या मागे पडू नका. असे अनेक लोक आहेत, ज्यांच्यावर आरोप झाले आहेत. साजिदला आम्ही चांगल्याप्रकारे ओळखतो.   आम्हाला केवळ त्याच्याच बद्दल विचारा, असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :साजिद खानकिरण खेरमलायका अरोरा