Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉस मराठी २ -“पुरूषांनो स्वावलंबी व्हा, स्वयंपाक करायला शिका” सुरेखा पुणेकर यांनी दिला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 13:18 IST

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सगळे पुरुष मिळून स्वयंपाक करणार आहेत, त्यामुळे घरातील बायकांना आज आराम मिळणार आहे.

बिग बॉस मराठीच्या घरामधून काल विद्याधर जोशी घरा बाहेर पडले. आज घरामध्ये नवीन कॅप्टन निवडला जाणार आहे. बिग बॉस आज सदस्यांवर “मनोरा विजयाचा” हे कार्य सोपवणार आहेत. किशोरी शहाणे आणि शिव ठाकरे यांमध्ये हे कार्य रंगेल. ज्यामध्ये त्यांना  समर्थकांकडून आप आपले ठोकळे जमवून त्याचा मनोरा बनवायचा आहे तसेच तो मनोरा समर्थकांच्या मदतीने तो टिकवून ठेवणे आवश्यक आहे. आणि कार्याच्या शेवटी ज्या उमेदवाराचा मनोरा दुसऱ्या उमेदवाराच्या मनोऱ्यापेक्षा मोठा आणि सुस्थितीत दिसेल तो उमेदवार या आठवड्यामध्ये घराचा नवीन कॅप्टन म्हणून घोषित होईल. टास्क दरम्यान सदस्यांमध्ये भांडण, वाद – विवाद हे होणारच. टास्क दरम्यान माधव आणि विणामध्ये पुन्हा एकदा वाद रंगणार आहे. आता हे बघणे रंजक असणार आहे की, शिव आणि किशोरी मध्ये कोण बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन बनेल...तसेच सुरेखा पुणेकर यांनी सगळ्या पुरुषांना एक सल्ला दिला.

 

“पुरूषांनो स्वावलंबी व्हा, स्वयंपाक करायला शिका”. त्याचं झाल असं, आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सगळे पुरुष मिळून स्वयंपाक करणार आहेत, त्यामुळे घरातील बायकांना आज आराम मिळणार आहे. आणि यावरूनच सुरेखा पुणेकर सगळ्या पुरूषांना संदेश दिला स्वयंपाकाबद्दल अडाणी राहू नका, स्वयंपाक शिका... म्हणजे घरातील स्त्रीला बाहेर जाता येईल, मज्जा करता येईल... कुठलाही पुरुष कितीही कष्ट करत असला तरी देखील त्याला एखादी गोष्ट तयार करता आलीच पाहिजे...भूक लागली तर स्वत:करून खाऊ शकतो.

टॅग्स :सुरेखा पुणेकरबिग बॉस मराठी