ब्रिटनचा ड्यूक ऑफ डचेस ऑफ ससेक्स प्रिन्स हॅरी आणि हॉलिवूड अभिनेत्री मेगन मार्कल गतवर्षी मे महिन्यांत विवाहबद्ध झाले. या रॉयल विवाह सोहळ्यांने अख्ख्या जगाच्या डोळ्यांचे पारणे फेडले. लग्नानंतर काहीच दिवसांत मेगन प्रेग्नंट असल्याचे जाहिर करण्यात आले. यानंतर प्रिन्स हॅरी व मेगन मार्कल हे कपल रॉयल टूरअंतर्गत अनेक देशांचे दौरे करताना दिसले. अलीकडे हे कपल बर्केहेडच्या दौºयावर गेले. येथे या कपलने आणखी एक गोष्ट शेअर केली. ती म्हणजे, येत्या एप्रिल महिन्यात मेगन आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार असल्याची. होय, येत्या एप्रिलमध्ये प्रिन्स व मेगन यांच्या पहिल्या अपत्याचा जन्म होईल.
या दौ-यादरम्यान मेगनची मॅटर्निटी स्टाईल बरीच चर्चेत राहिली. यावेळी मेगन फॅशनेबल स्टाईलिश अंदाजात दिसली. यावेळी मेगनने पर्पल कलरचा अर्टिजिया ड्रेस आणि यावर ब्राईट रेड कलरचा ओव्हरकोट कॅरी केला होता. पण तिच्या हातातील ब्राऊन कलरच्या बॅगने सगळ्यांचे लक्ष वेधले. या बॅगची किंमत सुमारे दीड लाख रूपये असल्याचे कळते.
४ आॅगस्ट १९८१ मध्ये जन्मलेली मेगन मार्कल हॉलिवूडची अभिनेत्री होती. गत मे महिन्यात प्रिन्स हॅरी व मेगन मार्कल लग्नबंधनात अडकले होते. प्रिन्स हॅरीसोबत मेगनचे दुसरे लग्न आहे. हॉलिवूडची अभिनेत्री मेगन मार्कल घटस्फोटित असून अमेरिकन टीव्ही मालिका सुट्समध्ये तीने प्रमुख भुमिका साकारली होती. त्यानंतर २०११मध्ये तीने अमेरिकन निमार्ता ट्रेवर एंजलसनसोबत लग्न केले होते. मात्र, २०१३मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. प्रिन्स हॅरी आणि मेगनची भेट २०१६मध्ये एका मित्राच्या घरी झाली होती. प्रिन्स हॅरी ३३ वर्षांचा असून मेगन ३६ वर्षांची आहे. प्रिन्स हॅरी हा इंग्लडची राणी एलिझाबेथ द्वितीयचा नातू आणि वेल्सचे राजकुमार चार्ल्स आणि डायना यांचा लहान मुलगा आहे.