Join us

रुचिराचं 'माया'जाल; 'माझ्या नवऱ्याची बायको'फेम अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहून पडाल प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 16:15 IST

Ruchira jadhav: रुचिराने माझ्या नवऱ्याची बायको व्यतिरिक्त बेदुणे दहा, माझे पती सौभाग्यवती, प्रेम हे, तुज्यावाचून करमेना या मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रुचिरा जाधव. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत माया ही भूमिका साकारून रुचिरा विशेष प्रसिद्धीस आली. ही मालिका संपून आता बराच काळ लोटला आहे. मात्र, तिची लोकप्रियता यत्किंचितही कमी झालेली नाही. रुचिरा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. यावेळी तिचा  असाच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या रुचिराने अलिकडेच तिचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने केलेल्या स्मित हास्यामुळे अनेकांची मनं जिंकली आहेत. रुचिराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत असून अल्पावधीत त्याच्यावर कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पडल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, रुचिराने माझ्या नवऱ्याची बायको व्यतिरिक्त बेदुणे दहा, माझे पती सौभाग्यवती, प्रेम हे, तुज्यावाचून करमेना या मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. शुद्ध देसी या युट्यूब चॅनलवरील 'माझ्या मित्राची गर्लफ्रेंड' या वेब सीरिजमध्येही तिने काम केले आहे. तसंच 'बंच ऑफ रेड रोजेस' हे नाटक आणि 'लव्ह लफडे' या चित्रपटातही ती झळकली आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजनटिव्ही कलाकारमाझ्या नवऱ्याची बायको