Join us

'मसान' ची अभिनेत्री लग्न बंधनात अडकणार, मेहंदीचे फोटो व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 17:21 IST

अभिनेत्री श्वेता त्रिपाठी लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. येत्या 29 जूनला श्वेता रॅपर स्लो चिता ऊर्फ चैतन्य शर्मासोबत लग्न करत आहे. 

मुंबई : मोजक्याच पण वेगळ्या सिनेमांमध्ये आपल्या अदाकारीने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री श्वेता त्रिपाठी लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. येत्या 29 जूनला श्वेता रॅपर स्लो चिता ऊर्फ चैतन्य शर्मासोबत लग्न करत आहे. 

श्वेताच्या लग्नाची तयारी जोरदार सुरु झाली असून तिच्या मेहंदीचे फोटो समोर आले आहेत. तिच्या मेहंदी सेरमनीचे फोटो सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहेत. श्वेताचं लग्न गोव्यात पार पडणार आहे. 

श्वेता त्रिपाठी हे नाव तसं फार लोकप्रिय नसलं तरी तिने 'मसान' आणि 'हरोमखोर' सिनेमात केलेलं काम आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या दोन्ही सिनेमात तिने अफलातून काम केलं होतं. आता ती बॉयफ्रेन्ड चैतन्य शर्मासोबत लग्न बंधनात अडकणार आहे. 

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी