Join us

भर बाजारात गुंडांनी काढली दिपूची छेड; 'या' कारणामुळे इंद्रा मदत करण्यास असमर्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 19:00 IST

Mann udu udu zhalay : दिपू घरातल्या गणपतीची पूजा आटोपून बहिणीसोबत गणेशवाडीच्या राजाला प्रसाद घेऊन जाते. तिथे तिची आणि इंद्राची भेट होते.

ठळक मुद्देदिपूने दिलाय इंद्राला अहिंसेच्या मार्गावर चालण्याचा सल्ला

'फुलपाखरु' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे. सध्या हृता 'मन उडू उडू झालं' या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकत आहे. विशेष म्हणजे काही आठवड्यांपूर्वीच सुरु झालेली ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून यातील दिपू आणि इंद्राची जोडी प्रेक्षकांना विशेष भावतांना दिसत आहे. 

रंजक वळणावर येऊन ठेपलेल्या या मालिकेत इंद्रा आता हळूहळू दिपूच्या प्रेमात पडू लागला आहे. त्यामुळे ती सांगेल त्या सगळ्या गोष्टी त्याला पटत असून तो त्याच पद्धतीने वागू लागला आहे. मात्र, दिपूची प्रत्येक गोष्ट ऐकणं इंद्राला चांगलंच महागाच पडणार आहे. भर बाजारात काही गुंड दिपूची छेड काढतात. मात्र, तिने सांगितलेल्या अहिंसेच्या तत्वामुळे त्याचे हात बांधले जाणार आहेत.

'मन उडू उडू झालं' मालिकेत दिपू घरातल्या गणपतीची पूजा आटोपून बहिणीसोबत गणेशवाडीच्या राजाला प्रसाद घेऊन जाते. तिथे तिची आणि इंद्राची भेट होते. मात्र, बाजारात असलेल्या गर्दीचा फायदा घेत एक मुलगा तिची छेड काढतो. हा प्रकार पाहून इंद्र प्रचंड संतापतो. परंतु, दिपूने इंद्राला अहिंसेच्या मार्गावर चालण्याचा सल्ला दिलेला असतो. त्यामुळे इंद्राचे हात बांधलेले असतात.

दरम्यान, दिपूची छेड काढल्यामुळे इंद्राच्या रागाचा उद्रेक झाला आहे. मात्र, दिपूच्या शब्दाखातर तो शांतपणे सारं काही पाहतो कि दिपूचा शब्द मोडून या छेड काढणाऱ्याला अद्दल घडवतो हे पाहणं सध्या औत्सुक्याचं ठरणार आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रिटीऋता दूर्गुळे